उपराष्ट्रपती कार्यालय

शाश्वत विकासासाठी भारताची वचनबद्धता केवळ शब्दातच नाही तर कृतीतूनही प्रतीत होते - उपराष्ट्रपती


पर्यावरण संरक्षणासह आर्थिक वाढीचा समतोल साधण्यासाठी भारत जगासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ म्हणून कार्यरत - उपराष्ट्रपती

Posted On: 07 FEB 2024 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

आपल्या समाजाच्या जडणघडणीत अंतर्भूत असलेली सर्व स्तरांवरील पर्यावरण संरक्षण आणि हवामान न्याय विषयक तत्वे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागतिक नेतृत्वाच्या गरजेवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज भर दिला. पर्यावरणाच्या संरक्षणासह आर्थिक वाढीचा समतोल राखणाऱ्या भारताच्या उपक्रमांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, "भारत जगभरातील राष्ट्रांसाठी प्रेरणास्थान आहे."

परस्परांशी निगडित जगात आपण सामोरे जात असलेल्या आव्हानांना कोणतीही सीमा नाही हे आपण ओळखले पाहिजे अशी अपेक्षा धनखड यांनी आज नवी दिल्लीतील ऊर्जा आणि संसाधन संस्थेत जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 ला संबोधित करताना व्यक्त केली.

"भारताची वचनबद्धता केवळ शब्दातच नाही तर कृतीतही प्रतीत होते, धोरणांच्या अंमलबजावणीमुळे आपण पुरस्कार करत असलेल्या तत्त्वांचे समर्पण प्रतिबिंबित होते," असेही त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करत, आपली आर्थिक प्रगती शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेशी सुसंगत असणे आवश्यक आहे आणि आपल्या भावी पिढ्यांना अभिमानाने मिरवता येईल असा वारसा आपण सोडला पाहिजे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा. -

https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=2003692

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2003787) Visitor Counter : 81


Read this release in: English , Urdu , Hindi