राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गयानाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 07 FEB 2024 9:30PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

 


गयानाचे पंतप्रधान, ब्रिगेडियर (निवृत्त) मार्क फिलिप्स यांनी आज (7 फेब्रुवारी, 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

पंतप्रधान फिलिप्स आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या  की, भौगोलिकदृष्ट्या दूर असूनही, आपल्या वसाहतवादी भूतकाळामुळे; आपल्या वैविध्यपूर्ण आणि बहुसांस्कृतिक समाजामुळे; आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय  समुदायासह संस्कृती, परंपरा आणि भाषेच्या मजबूत बंधनाद्वारे गयानाला जवळपास दोन शतके आपले निवास बनवलेल्या भारतीय समुदायामुळे भारत आणि गयाना जोडलेले आहेत.

आपल्या द्विपक्षीय व्यापार यादीत आणखी वैविध्य आणण्याची गरज असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. आयुर्वेद, जैव-इंधन आणि कृषी - विशेषत: भरडधान्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य सुधारण्याची अफाट क्षमता आहे. या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करून आपण हवामान बदल आणि अन्न असुरक्षिततेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

करीकॉमचे फिरते अध्यक्षपद तसेच या महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांनी गयानाचे अभिनंदन केले. ग्लोबल साउथचे प्रमुख सदस्य या नात्याने उभय देश सुधारित बहुपक्षीयतेचे पुरस्कर्ते असल्याचे त्यांनी उद्धृत केले.

राष्ट्रपतींनी हवामान बदल, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात गयानाच्या प्रयत्नांची आणि नेतृत्वाची प्रशंसा केली.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2003780) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil