रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
सर्व प्रयत्न यशस्वी करण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण यावर श्री नितीन गडकरी यांचा भर
रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा आणि सर्व भागधारकांच्या योग्य परिश्रमाचा परिणाम आहे : श्री गडकरी
Posted On:
07 FEB 2024 11:33AM by PIB Mumbai
सर्व प्रयत्नांत यश मिळविण्यासाठी कामाचे वितरण आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. “प्रकल्प व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षा मधील उत्कृष्टता” या संकल्पनेवरील 2022 राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार (NHEA)” वितरण समारंभाला काल त्यांनी मार्गदर्शन केले. रस्ते, बोगदे, पूल यांच्या बांधकामांमधे मिळवलेल्या अविश्वसनीय गती ही नागरिकांसाठी सन्मानाची बाब असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
रस्ते पायाभूत सुविधांचा विकास हा सांघिक भावनेचा परिणाम असल्याचे श्री गडकरी म्हणाले. खर्च कमी करणे आणि बांधकामाचा दर्जा वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे ते यावेळी म्हणाले. आपण पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे,असेही ते पुढे म्हणाले.

ज्यूरींनी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ व्ही के सिंग.यांनी यावेळी त्यांचे आभार मानले आणि प्रतिष्ठित पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

देशातील रस्ते पायाभूत सुविधा मजबूत आणि वाढवण्याच्या उद्देशाने, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 2018 मध्ये "राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार (NHEA)" सुरू केले ज्यामुळे महामार्ग बांधकाम आणि देखभाल प्रक्रियेतील भागधारकांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात स स्पर्धात्मकतेची भावना वाढीस लागते.

यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) या विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर हितसंबंधी उपस्थित होते.

****
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2003427)