पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भारत उर्जा सप्ताह 2024 - या भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषदेसाठी गोवा सज्ज
हा कार्यक्रम संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळी एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण असून भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी उत्प्रेरक म्हणूनही काम करणार
या भारत उर्जा सप्ताहाच्या कार्यक्रमात 120 हून अधिक देशांमधून सहभागी येण्याची अपेक्षा.
Posted On:
04 FEB 2024 6:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 2023 आवृत्तीच्या यशानंतर, भारतातील गोवा येथे 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा दिवस जवळ येत असताना, केंद्रातील नोडल मंत्रालय आणि गोवा प्रशासनासह विविध सरकारी विभाग या महा मेळाव्याच्या आयोजना दरम्यान स्थानिक जनजीवन प्रभावित होऊ नये यासाठी आयोजनात गुंतलेल्या सर्व संभाव्य लॉजिस्टिक आणि पर्यावरणीय बाबींची काळजी घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
भारत उर्जा सप्ताह 2024 मध्ये 35,000 हून अधिक सहभागी, 350 हून अधिक प्रदर्शक, 80 हून अधिक चर्चा सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी 400 हून अधिक वक्ते आणि 120 हून अधिक देशांमधून 4,000 हून अधिक प्रतिनिधी येतील अशी अपेक्षा आहे. हा कार्यक्रम जागतिक प्रदर्शकांच्या विस्तृत श्रेणीचे आयोजन करेल, मुख्य तेल क्षेत्र सेवांचा विस्तार करेल, वातावरणाला गतिशीलता प्रदान करेल आणि ऊर्जा परिसंस्थेतील सर्वोत्तम आणि उज्ज्वल पर्याय एकत्र आणण्यासाठी एक अतुलनीय जागतिक व्यासपीठ प्रदान करेल.
ऊर्जा परिसंस्थेच्या जागतिक मेळाव्याला, आयपीएसएचईएम-ओएनजीसी प्रशिक्षण संस्थेत 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान, उर्जावान आणि उत्साहपूर्ण समुद्र किनारा लाभलेल्या गोव्याच्या रुपात एक आदर्श यजमान राज्य लाभले आहे.
जगभरातील ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख धोरणकर्त्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जागतिक कार्यक्रमाचे उदाहरण स्थापित करेल. या सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या विविध चर्चा सत्रात, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी सहभागी होणार आहेत.
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिपत्याखाली फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीने [FIPI] आयोजित केलेला, भारत उर्जा सप्ताह 2024, या उद्योगांमधील तज्ञ, धोरण निर्माते, उद्योजक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यात अर्थपूर्ण चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहयोग यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.
भारत उर्जा सप्ताह 2024 चे महत्त्व
भारताने एकाच वेळी ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण सुनिश्चित करण्याच्या आव्हानांवर मात देण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
भारत उर्जा सप्ताह, अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांना सुलभ, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या चैतन्यदायी निर्णयातून शिकण्याची संधी जगाला प्रदान करतो.
भारत उर्जा सप्ताह, ऊर्जा क्षेत्रामधील भागधारकांना मुक्तपणे आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याची तसेच अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकाच छताखाली संधी देत हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक लढाईत भारताचे नेतृत्व अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2002452)
Visitor Counter : 140