आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स नागपूर येथे अत्याधुनिक स्किल लॅब तसच  सेंट्रल स्टेराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट   या सुविधेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन 

प्रविष्टि तिथि: 03 FEB 2024 10:15PM by PIB Mumbai

 

नागपूर 3 फेब्रुवारी 2024

नागपूरच्या मिहान स्थित  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूर येथे अत्याधुनिक स्किल लॅब तसेच  सेंट्रल स्टराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट  - सीएसएसडी  या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवारएस. पी. सिंग बघेल यांच्या  उपस्थितीमध्ये आज  दुरुस्थ  पद्धतीने झाले. या कार्यक्रमाचा मुख्य समारंभ राजस्थानच्या एम्स जोधपुर येथे झाला ज्याचे थेट प्रक्षेपण नागपूर एम्सच्या सभागृहात करण्यात आले . याप्रसंगी शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता ( डीन ॲकॅडेमिक्स ) डॉ. मृणाल फाटक यांनी  एम्स नागपूरच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाची माहिती दिलीसंस्थेने अल्पावधीत प्राप्त केलेल्या विविध शैक्षणिक यश आणि वैद्यकीय टप्पे यावर त्यांनी  प्रकाश टाकला.

आज उद्घाटन झालेली  एम्स नागपूर येथील कौशल्य प्रयोगशाळा ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे ह्युमन पेशंट सिमुलेटर आणि वर्चुअल टास्क ट्रेनर्स या प्रमुख सुविधांनी सुसज्ज अशा या प्रयोगशाळा राहतील. या प्रयोगशाळामुळे कौशल्य प्रशिक्षण   आपत्कालीन परिस्थिती, अनस्थेशिया सिमुलेशन आणि परिस्थिती आधारित शिक्षण या उपक्रमांना चालला मिळणार आहे. या सुविधेमुळे वास्तविक रुग्णांना धोका न देता शिकण्यासाठी एका सुरक्षित वातावरणाची निर्मिती होणार असून अत्याधुनिक वर्चुअल टास्क  ट्रेनर सुविधांमध्ये  पेशंट केअर सिमुलेटर, इंजेक्शन आणि प्रक्रिया सिमुलेटर यासारख्या    विविध कौशल्य सिमुलेटरचा समावेश आहे.  या स्किल लॅबचा वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. वैद्यकीय विद्यार्थी ,रहिवासी डॉक्टर, परिचारिका, प्राध्यापक आणि इतर आरोग्य सेवा कर्मचा-यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वाढवता येणार आहे.

यासोबतच सेंट्रल स्टेराइल सर्व्हिसेस डिपार्टमेंट - सीएसएसडी   ही एक प्रशस्त अशी सुविधा  5 हजार चौरस फूट परिसरात मेडिकल स्र्टलायझेशन तंत्रज्ञानामध्ये रुग्णांची काळजी आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानके सुनिश्चित करेल.  या सुविधेमध्ये अत्याधुनिक प्रगत उपकरणे, तंत्रज्ञान, कार्यक्षम प्रणाली , 24 तास अखंड सेवा यांचा समावेश आहे.

***

AIIMS PRO/SR/DW/DD/PK

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2002347) आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English