नौवहन मंत्रालय
सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सागरसेतू (एनएलपी-मरीन) मध्ये सागरी एकल खिडकी आणि एमएमडी प्रणालींचे उद्घाटन
Posted On:
01 FEB 2024 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली येथे सागरसेतू (एनएलपी -मरीन) प्लॅटफॉर्ममध्ये मेरीटाइम सिंगल विंडो (एमएसडब्ल्यू) आणि सागरी वाणिज्य विभाग (एमएमडी) या दोन डिजिटल अग्रगण्य प्रणालींचे उद्घाटन केले. यावेळी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग (MoPSW) राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही अभिनव प्रणाली कागद आधारित आणि मानवी प्रक्रियांवरील अवलंबित्व दूर करून कागदविरहित प्रक्रिया युगात प्रवेश करेल. एमएसडब्ल्यू जहाजांचे आगमन, मुक्काम आणि निर्गमन संबंधित दस्तावेज ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा देते, ज्यामुळे बंदर, इमिग्रेशन, सीमाशुल्क यासह विविध प्राधिकरणांकडून जलद मंजुरी मिळू शकते. या परिवर्तनाची फलनिष्पत्ती म्हणून बंदरांमधील जहाजे आणि मालाची प्रतीक्षा वेळ 40% पर्यंत कमी होईल.
* * *
S.Bedekar/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001659)
Visitor Counter : 96