माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यामध्ये सुरु असलेल्या डीआरएम डिजिटल रेडिओ जागरूकता मोहिमेला वेग
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 7:17PM by PIB Mumbai
गोवा, 1 फेब्रुवारी 2024
डीआरएम (DRM) डिजिटल रेडिओचे प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने गोव्यामध्ये जनजागृती मोहीम सुरू आहे.
डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबाद येथील ऑडिओ व्हिडिओ निर्मिती आणि संशोधन केंद्राचे माजी उपसंचालक डॉ. थम्मिनाना कृष्णा राव यांच्या नेतृत्वाखाली, आणि आकाशवाणी पणजी, आणि दूरदर्शन केंद्र पणजीचे उपमहासंचालक आणि कार्यालय प्रमुख सुनील भाटिया, आणि आकाशवाणी पणजी येथील सहाय्यक अभियंता सी.पी. हरी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, ही मोहीम निवडक गटांवर लक्ष केंद्रित करते. यामध्ये कार शोरूम, वाहन चालक, विक्री कर्मचारी, कर्मचारी व्यवस्थापक, परस्पर संबंध व्यवस्थापक आणि विक्री अधिकारी यांचा समावेश आहे.
मारुती (एरिना आणि नेक्सा), एमजी मोटर्स, टोयोटा आणि मर्सिडीज बेंझसह विविध शोरूममध्ये ही मोहीम राबविली जात आहे. गोवा राज्यात डीआरएम डिजिटल रेडिओ सुविधांनी सुसज्ज असलेल्या सुमारे दोन लाख कार आहेत.
या मोहिमेमध्ये 30 आणि 31 जानेवारी रोजी उत्तर गोव्यात जनजागृती करण्यात आली, 1 आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी दक्षिण गोव्यापर्यंत त्याचा विस्तारित केला जाईल.

मोहिमेमध्ये दररोज पाच शोरूममधील सुमारे 150 विक्री कर्मचारी, कार मालक आणि ड्रायव्हर यांच्याकडून नमुना सर्वेक्षण आणि फीडबॅक यासारखे अतिरिक्त कार्यक्रम समाविष्ट केले जातील.
या दोन दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंवाद आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अतिथी व्याख्यानेही नियोजित आहेत.
* * *
PIB Panaji | NM/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2001643)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English