संरक्षण मंत्रालय

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी मस्कत येथे 12 व्या भारत-ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या बैठकीचे भूषवले सह-अध्यक्षपद


भारत आणि ओमान यांच्यात संरक्षण सामुग्री आणि उपकरणे खरेदी करण्याबाबत सामंजस्य करार

Posted On: 31 JAN 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 31 जानेवारी 2024 रोजी मस्कत येथे ओमानच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद बिन नसीर बिन अली अल झाबी यांच्यासमवेत 12 व्या संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. 

बैठकीदरम्यान, उभय देशांनी भारत आणि ओमानमधील मजबूत संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि प्रशंसा केली. संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या बैठकीत प्रशिक्षण, संयुक्त सराव, माहितीची देवाणघेवाण, समुद्रविज्ञान, जहाज बांधणी आणि देखभाल, दुरुस्ती, परिचालन (एमआरओ ) या क्षेत्रातील सहकार्याच्या अनेक नवीन संधींबाबत चर्चा करण्यात आली, यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर विश्वास आणि आंतर-कार्यान्वयन क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मते मांडली. दोन्ही देशांनी संरक्षण उद्योगांच्या सहकार्यावर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय संरक्षण संबंधांना आणखी चालना देण्यासाठी प्रभावी आणि व्यवहार्य उपायांवर चर्चा केली.

सुलतान सुलतान हैथम बिन तारिक यांच्या डिसेंबर 2023 च्या भेटीदरम्यान मान्यता देण्यात आलेल्या  'भविष्यासाठी भागीदारी' या शीर्षकाच्या भारत- ओमान  संयुक्त व्हिजन दस्तऐवजाच्या अंमलबजावणीच्या दिशेने संरक्षण सामुग्री आणि उपकरणांच्या खरेदीशी संबंधित एका सामंजस्य करारावर संरक्षण सचिव आणि सरचिटणीस यांनी स्वाक्षरी केली, हा करार संरक्षण सहकार्याच्या नवीन क्षेत्रासाठी एक आराखडा प्रदान करेल.

ओमानच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान संरक्षण सचिवांनी ओमानच्या संरक्षण मंत्रालयाच्या सरचिटणीसांसोबत द्विपक्षीय चर्चाही केली. चर्चेदरम्यान, गिरीधर अरमाने यांनी देशांतर्गत संरक्षण उद्योगाच्या क्षमता अधोरेखित केल्या आणि ओमानच्या सशस्त्र दलांसोबत फलदायी भागीदारीसाठी उत्सुक असल्याचे नमूद केले.ओमानने भारतीय संरक्षण उद्योगाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

संरक्षण सचिवांनी ओमानच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाला विशेषत: एरोस्पेस आणि सागरी क्षेत्रातील संरक्षण औद्योगिक क्षमता पाहण्यासाठी भारत दौऱ्यावर येण्यासाठी आमंत्रित केले.

ओमान सल्तनतच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस डॉ मोहम्मद बिन नसीर बिन अली अल झाबी यांच्या निमंत्रणावरून संरक्षण सचिवांनी 30-31 जानेवारी 2024 या कालावधीत ओमानला भेट दिली.

ओमान हा आखाती क्षेत्रातील भारताचा सर्वात जवळचा संरक्षण भागीदार आहे आणि संरक्षण सहकार्य हा भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयाला आले आहे. दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000961) Visitor Counter : 90


Read this release in: English , Urdu , Hindi