वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीजीएफटीतर्फे धोरणात्मक व्यापार नियंत्रणाबाबत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
दुहेरी वापराच्या वस्तू, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान यांच्या निर्यातीवर आधारित भारतात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच राष्ट्रीय परिषद
Posted On:
30 JAN 2024 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील डीजीएफटी अर्थात परदेशी व्यापार महासंचालनालयाने केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर सरकारी संस्थांसह भागीदारीत आज धोरणात्मक व्यापार नियंत्रणाबाबतच्या राष्ट्रीय परिषदेचे (एनसीएसटीसी) आयोजन केले होते.भारताचे धोरणात्मक व्यापार नियंत्रण [विशेष प्रकारची रसायने, जीवजंतू, साहित्य, साधने आणि तंत्रज्ञान (एससीओएमईटी) आणि निर्यातविषयक नियंत्रण यांच्याशी संबंधित] प्रणाली आणि आणि तिचा दुहेरी वापराच्या (औद्योगिक आणि लष्करी), सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञाने यांच्या निर्यातीशी संबंधित नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे, यासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम पद्धतीने वापर यावर या परिषदेत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या परिषदांतील पद्धतीच्या ऐवजी, यावेळी, नव्या प्रारुपासह, अधिक मोठ्या प्रमाणातील आंतरराष्ट्रीय सहभाग तसेच भारत सरकारच्या विविध संघटना, संबंधित क्षेत्रांतील औद्योगिक भागधारक, शिक्षण तज्ञ तसेच संशोधन संस्था यांच्या अधिक व्यापक सहभागासह डीजीएफटीतर्फे ही एनसीएसटीसी आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ही परिषद आयोजित करण्यात आली.
भारताच्या धोरणात्मक व्यापार नियंत्रण प्रणालीचा भाग म्हणून तसेच संबंधित नियंत्रण सूची, मार्गदर्शक तत्वे तसेच आंतरराष्ट्रीय संमेलनांतील तरतुदी, यंत्रणा आणि पद्धती यांच्याशी अनुरूप व्हावे म्हणून, भारत परराष्ट्र व्यापार धोरणाअंतर्गत डीजीएफटीने अधिसूचित केलेल्या एससीओएमईटी सूचीमधील सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान यांच्यासह दुहेरी वापराच्या वस्तू, अणुऊर्जेशी संबंधित वस्तू यांची निर्यात नियंत्रित करत असतो.
केंद्र सरकार, उद्योग क्षेत्र यांचे प्रतिनिधी आणि परदेशी प्रतिनिधी यांच्यासह 500 हून अधिक लोकांनी या परिषदेत भाग घेतला आणि सरकार तसेच उद्योग क्षेत्रातील जाणकार वक्ते आणि धोरणात्मक व्यापार नियंत्रण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञ यांच्यासह आपल्या उद्योग क्षेत्राने धोरणात्मक व्यापार नियंत्रणविषयक समस्यांचा केलेला उहापोह लक्षात घेतला.
परिणामकारक धोरणात्मक व्यापार नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करत या परिषदेने या संदर्भातील भारताच्या कायदेविषयक तसेच नियामकीय व्यवस्थेचे दर्शन घडवले आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणणाऱ्या शस्त्रांचा (डब्ल्यूएमडी) तसेच त्यांच्या वितरण यंत्रणांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने धोरणात्मक व्यापार नियंत्रणसंबंधी सर्वोत्तम पद्धती तसेच संबंधित माहिती यांची देवाणघेवाण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्याबरोबरच, सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक यांच्या दरम्यान सुलभ पद्धतीने चर्चा घडवून आणून नव्याने उदयाला येणाऱ्या संवेदनशील वस्तू आणि तंत्रज्ञानाशी संबंधित जोखमींचे मूल्यमापन तसेच उपशमन करणे, आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांना खतपाणी घालणे आणि उद्योग क्षेत्राकडून याविषयीचे अभिप्राय मिळवणे इत्यादींसाठी देखील या परिषदेचे आयोजन उपयुक्त ठरले.
R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000696)
Visitor Counter : 85