संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण कमांडचे लष्कर कमांडर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Posted On: 27 JAN 2024 6:51PM by PIB Mumbai

 

पुणे कॅम्प येथे शनिवारी दक्षिण कमांडचे लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएमयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मराठा लाईट इन्फंट्रीच्या रेजिमेंटचे माजी कर्नल लेफ्टनंट जनरल पीएसएस पन्नू हे देखील या शुभ प्रसंगी  उपस्थित होते.

विजय दिवस समारोह समिती कराडचे संस्थापक सदस्य, अध्यक्ष आणि विश्वस्त कर्नल संभाजी पाटील यांनी हा पुतळा भेट दिला आहे. कराड येथील विजय दिवस समारोह समिती कराड आणि दक्षिण कमांड मुख्यालयाच्या 25 वर्षांच्या दीर्घ सहकार्याची ही स्मृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे कराडच्या लोकांकडून दक्षिण कमांड मुख्यालयाला मिळालेल्या प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आज अनावरण झालेल्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर 17 व्या शतकाच्या मध्यावर अंगभूत नेतृत्वाचे मूर्त स्वरूप असलेले महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या तपशीलांचा उल्लेख आहे.

शौर्या दक्षं युद्धाय. बलिदान परम धर्म

आपल्या प्रभावी कारभारामुळे शूर मराठा योद्ध्यांच्या मनावर अमिट छापच सोडणाऱ्या, बलाढ्य आणि अधिक प्रस्थापित शत्रूंना आव्हान देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी एक सामरिक जाळे स्थापन करण्याच्या संकल्पनेचा पुढाकार घेऊन युद्धात क्रांती घडवून आणणाऱ्या शूर योद्ध्यांच्या गौरवशाली गाथांचे स्मरण, लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी आपल्या भाषणात केले. शिवरायांचे लष्करी यश हे केवळ त्यांची विलक्षण सामरिक प्रतिभाच दर्शवत नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चिरंतन प्रेरणास्त्रोत देखील आहे, असे त्यांनी सांगितले.

***

M.Pange/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000139) Visitor Counter : 78


Read this release in: English