उपराष्ट्रपती कार्यालय
“आपल्या मुली आपल्या युवा शक्तीचा गुणात्मक प्रमुख घटक"-उपराष्ट्रपती
भ्रष्टाचाराच्या निरंकुशपणाची जागा लोकशाहीच्या गुणवत्तेने घेतली आहे---उपराष्ट्रपती
संसद आणि राज्य विधिमंडळात महिलांना एक तृतीयांश आरक्षण हे ऐतिहासिक : उपराष्ट्रपती
युवकांनी नवोन्मेष, शोध, संशोधन आणि उद्योजकतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे- उपराष्ट्रपती
स्वच्छ भारत अभियानातील युवकांच्या भूमिकेचे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन. एस. एस.) स्वयंसेवकांशी संवाद साधला
Posted On:
27 JAN 2024 12:00PM by PIB Mumbai
"प्रत्येक क्षेत्रात मुलींची प्रचंड वृद्धी, बांधिलकी आणि सहभाग दिसून येतो. आपल्या मुली आपल्या युवा शक्तीचा गुणात्मक प्रमुख घटक आहेत", असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले.
संसद भवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन. एस. एस.) स्वयंसेवकांना संबोधित करताना धनखड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील मुली आणि महिला सहभागींच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. संसदेत आणि राज्य विधिमंडळात महिलांना एक तृतीयांश आरक्षणाच्या तरतुदीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. देशातील सध्याच्या परिसंस्थेकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आज भ्रष्टाचार आणि मध्यस्थांचे उच्चाटन झाले आहे आणि तरुणांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्याच्या अफाट संधी आहेत. "भ्रष्टाचाराच्या निरंकुशपणाची जागा लोकशाहीच्या गुणवत्तेने घेतली आहे", असे त्यांनी अधोरेखित केले.
युवक हे 2047 मधील भारताचे पथदर्शक आणि शिल्पकार आहेत असे संबोधत, धनखड यांनी उपस्थित तरुण स्वयंसेवकांना नवोन्मेषी होण्यासाठी, संशोधन तसेच उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अभिमानास्पद भारतीय होण्यासाठी देशाला नेहमीच प्रथम स्थान देण्याचे आवाहन केले.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, राज्यसभेचे सचिव रजित पुन्हानी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार सचिव मीता राजीवलोचन आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या संवादानंतर सर्व एन. एस. एस. स्वयंसेवकांना नवीन संसद भवनाची सफर घडवण्यात आली.
***
M.Iyengar/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000016)
Visitor Counter : 97