सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी पीएम यंग अचिव्हर्स शिष्यवृत्ती योजना (पीएम यशस्वी)


पीएम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्तीसाठी 32.44 कोटी रुपये आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 387.27 कोटी रुपये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जारी

Posted On: 25 JAN 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

पीएम यशस्वी ही इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी), बिगर अधिसूचित, भटक्या आणि विमुक्त जमाती (डीएनटी ) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता नववी ते दहावी पर्यंत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मॅट्रिकोत्तर किंवा उच्च शिक्षणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत त्यांना ‘अव्वल श्रेणीचे शालेय शिक्षण ’ आणि ‘अव्वल श्रेणीचे महाविद्यालयीन शिक्षण ' या योजनेंतर्गत उच्च दर्जाच्या  शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी देखील मिळते. ‘ओबीसी मुला- मुलींसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना’ अंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधाही पुरवली  जाते. योजनांचे घटक खालीलप्रमाणे आहेत.

  1. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.
  2. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
  3. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे शालेय शिक्षण.
  4. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे महाविद्यालयीन शिक्षण. 
  5. ओबीसी मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधणे.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999674) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Hindi