आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) आपल्या जीवनशैली सुधार उपचारकेंद्रामध्ये रुग्णांसाठी विशिष्ट रोग योगासने, पाककला सत्रे सादर करण्यासाठी सज्ज
अशी सुविधा सुरू करणारे देशातील पहिले एम्स रुग्णालय, आता इतर एम्स रुग्णालयांना करणार मार्गदर्शन
Posted On:
25 JAN 2024 6:20PM by PIB Mumbai
नागपूर, 25 जानेवारी 2024
एम्सचे नागपूर येथील ‘जीवनशैली सुधार उपचारकेंद्र', हे अशा प्रकारचे पहिले रुग्णालय नाविन्यपूर्ण मार्गाने रुग्णांचे आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यासाठी सज्ज आहे. येथील उपचारकेंद्रामध्ये रुग्ण, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट आजार, नियमित योग आणि शारीरिक व्यायामाची सत्रे यांचा समावेश असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. एम्स प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत नागपूर येथील एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. हनुमंत राव, यांनी सांगितले की त्यांनी रुग्णांना सात्विक आहार तयार करण्याच्या कौशल्यात सक्षम करण्यासाठी पाककला सत्र सुरू केले आहेत.
बरेच रुग्ण त्यांच्या आहाराच्या सवयी बदलण्यास इच्छुक असतात,परंतु त्यांना कोणत्या पूरक सवयींचा अवलंब करावा हे माहित नसते. पाककला सत्रांमुळे त्यांना पूरक उपायांचा अवलंब करण्यास मदत होईल. या उपचारकेंद्राचे प्रमुख केंद्र फिजिओलॉजी विभाग आहे. ही जीवनशैली औषधाच्या सहा विविध स्तंभांवर भर देते: संपूर्ण-अन्न, वनस्पती-प्रधान खाणे; नियमित शारीरिक व्यायाम; पुनर्संचयित झोप; ताण व्यवस्थापन; सकारात्मक सामाजिक संबंध; आणि धोकादायक पदार्थ टाळणे हे ते सहा स्तंभ आहेत.
फिजिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मृणाल पाठक, यांनी माहिती दिली की, उपचारकेंद्र आरोग्य सेवा कर्मचार्यांची जीवनशैली विषयक समुपदेशन क्षमता वाढवण्यासाठी अल्प-मुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील आयोजित करणार आहे. योग्य रोगनिदान करून आणि वैयक्तिक कृती योजना तयार करून, अंदाजे 1000 हून अधिक रूग्णांवर त्यांचा लक्षणीय परिणाम आढळून आला आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग, टाइप 2 मधुमेह, पीसीओडी आणि लठ्ठपणा यासह विविध असंसर्गजन्य रोगांचे (एनसीडीएस) उपचार आणि प्रतिबंध या दोन्हीसाठी पुरावा-आधारित जीवनशैली प्रदान करणारे हे उपचारकेंद्र आहे. जीवनशैली बाह्य रुग्ण विभाग आयुष इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. बाह्य रुग्ण विभाग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत सुरु असते. त्याचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2021 रोजी एम्सचे माजी संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या हस्ते झाले. काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी या केंद्राला भेट दिली तेव्हा उपचार केंद्राने याबाबत बातमी प्रसारित केली.
डॉ. भारती प्रवीण पवार यांनी जीवनशैलीत समुपदेशन उपचार केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन दिले. आरोग्य जीवनशैलीत बदल करून त्यांनी भारतातील इतर एम्सना सर्वांगीण तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी असे दवाखाने सुरू करण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करावे असा प्रस्ताव मांडला. त्या दिशेने ही संस्था पावले टाकत आहे, अशी माहिती यावेळी डॉ.पाठक यांनी दिली.
* * *
PIB Nagpur | NM/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999641)
Visitor Counter : 63