सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (NSSO), औरंगाबाद च्या वतीने वार्षिक उदयोग सर्वेक्षण जागरूकता शिबीराचे आयोजन

Posted On: 25 JAN 2024 12:59PM by PIB Mumbai

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (NSSO), सांख्यिकी एवं कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, भारत सरकार, 1950 पासून देशाच्या सेवेत आहे. ते आपल्या देशव्यापी नमुना सर्वेक्षणांद्वारे विविध सामाजिक-आर्थिक मापदंडांवर एक मजबूत डेटाबेस विकसित करत आहे, ज्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारांना नियोजन आणि धोरणे विकासात मदत झाली आहे. 

वार्षिक उदयोग सर्वेक्षण (ASI) हे भारतातील औद्योगिक आकडेवारीचे प्रमुख स्त्रोत आहे. हे सर्वेक्षण कायद्याच्या वैधानिक तरतुदींनुसार सांख्यिकी संकलन कायदा, 2008 आणि त्याअंतर्गत 2011 मध्ये तयार केलेल्या नियमांनुसार दरवर्षी आयोजित केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेली माहिती सांख्यिकीय हेतूंसाठी वापरली जाते; तसेच ही माहिती सकल देशांतर्गत उत्पादनात औद्योगिक क्षेत्राचे योगदान मोजण्यासाठी आणि औद्योगिक विकासासाठी धोरणे तयार करण्यासाठी सरकारला मदत करते.

क्षेत्रीय कार्यालय, क्षेत्र संकार्य प्रभाग, राष्‍ट्रीय प्रतिदर्ष सर्वेक्षण कार्यालय, औरंगाबाद द्वारे औरंगाबाद येथील औद्योगिक घटक/उद्योजकांसाठी गुडइयर साउथ एशिया टायर्स प्रा. लिमिटेड येथे 24 जानेवारी 2024 रोजी जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक युनिट्स/उद्योजकांमध्ये सर्वेक्षणाचा उपयोग आणि महत्त्व समजून घेण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा या शिबिरचा उद्देश होता. 

या सत्राचे उद्घाटन जयप्रकाश होनराव, संयुक्त निदेशक, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय, क्षेत्र संकार्य  प्रभाग , क्षेत्रीय कार्यालय, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात होनराव यांनी, सर्वेक्षणाच्या यशात विविध उद्योगपतींच्या सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला. या सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेला डेटा राष्ट्रीय उत्पन्नचा अंदाज लावण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास, जलद औद्योगिक विकासाचे नियोजन, आणि धोरणे तयार करणे इ. साठी वापरला जातो. या सर्वेक्षणाद्वारे भांडवल, रोजगार आणि बेरोजगारीशी संबंधित, इंधन आणि वंगणचा वापर, कच्चा माल आणि इनपुट-आउटपुट, मूल्यवर्धन, श्रम उलाढाल, जीएसटी इत्यादी डेटा गोळा केला जातो. वेबद्वारे डेटा गोळा केला जात असल्याने युनिटद्वारे स्व-संकलन करण्याची तरतूद आहे. वार्षिक उदयोग सर्वेक्षण हे वैधानिक सर्वेक्षण असल्याने, सूचना प्राप्त झाल्यानंतर विहित वेळेत रिटर्न आणि संबंधित डेटा सबमिट करणे आवश्यक आहे.
वार्षिक उद्योग सर्वेक्षण 2022-23 साठी आवश्यक सहकार्यासाठी उद्योगांना यावेळी आवाहन आवाहन करण्यात आले. औरंगाबाद परिसरात असलेल्या 25 पेक्षा अधिक उद्योगांचे उद्योजक सक्रियपणे शिबीरात सहभागी झाले होते.

तसेच उद्योगपतींना ASI पोर्टलच्या कामकाजाबाबत जागरुक करण्यात आले आणि वेब पोर्टलमध्ये प्रदान केलेल्या स्व-संकलन पर्यायाचा वापर करणे आणि त्यांचे रिटर्न वेळेवर दाखल करणे यासाठी प्रवृत्त करण्यात आले. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या कार्यांची विस्तृत चर्चा करण्यात आली. उपस्थितांच्या शंकाचे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी निरसन केले. 

***

Sonal Tupe /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999478) Visitor Counter : 81


Read this release in: English