विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय समुदाय जागतिक वृद्धीमध्ये प्रमुख भूमिका बजावत असून त्यांनी आपल्याशा केलेल्या देशांमध्ये आणि समाजामध्ये ते योगदान देत आहेत आणि त्याच वेळी आपल्या मातृभूमीच्या मूलाधाराशी ते तितकेच खोलवर जोडले आहेत : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग
आजचा भारत त्यांना अधिक संधी आणि कार्यसुलभता प्रदान करतो : डॉ जितेंद्र सिंग
पहिल्या वैभव अभ्यासवृत्तीचा निकाल जाहीर, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या उपस्थितीत वैभव अभ्यासवृत्तीचा नवीन सत्राचा आरंभ
Posted On:
23 JAN 2024 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
भारतीय समुदाय जागतिक वृद्धी मध्ये प्रमुख भूमिका बजावत असून ते ज्या देशांमध्ये आणि समाजामध्ये स्थायिक झाले आहेत तिथे योगदान देत आहेत आणि त्याच वेळी आपल्या मातृभूमीच्या मूलाधाराशी ते तितकेच खोलवर जोडले आहेत, असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज सांगितले. आजचा भारत त्यांना अधिक संधी आणि कार्यसुलभता प्रदान करतो, असे ते म्हणाले.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाशमंत्री डॉ जितेंद्र सिंग, यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात पहिल्या वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) अभ्यासवृत्तीचे निकाल जाहीर केले आणि वैभवच्या पुढील सत्राचा आरंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि वैद्यकीय (STEMM) शाखांमधील आपला भारतीय समुदाय तांत्रिक परिवर्तन घडवून त्याचा अभिनव मार्गाने वापर करून आपला समाज आणि जग कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे ठरवण्यात, विशेषतः सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे डॉ जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
वैभवचे महत्व विशद करताना डॉ सिंग म्हणाले की वैभवचे छात्र ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिनलंड, जपान, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, यूके, यूएसए मधील सर्वोच्च संस्थांमधील आहेत आणि पुढील 3 वर्षांमध्ये सर्वाना भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करत भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय विज्ञान संस्था अशा भारतीय संस्थांमध्ये रुजू होतील. यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यात एक महत्त्वाचा मार्ग म्हणून संशोधन क्षमता प्रस्थापित करण्यात ते नक्कीच नेतृत्व जगाचे करतील.

''जे वैभव अधिछात्र भारतात येणार आहेत त्यांना मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षात झालेले अनेक बदल विशेषतः जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने घेतलेली गरुडझेप, नक्कीच लक्षात येईल,'' असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. ''अत्याधुनिक शोध आणि बहुविध शाखांमधल्या प्रगतीत भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक आघाडीवर आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक अध्ययनात सीमाभेद पुसत अंतराळ संशोधनापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत, जैव तंत्रज्ञानापासून नॅनो तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात, संपूर्ण मानवतेला उपयुक्त ठरणाऱ्या नवोन्मेषाची कास धरली आहे. हे यश भारताची वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेषातील वचनबद्धता अधोरेखित करते. विविध क्षेत्रांमधली देशाची प्रगती सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि जागतिक विज्ञान प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी आश्वासक आहे,'' असे ते म्हणाले.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर उपस्थित होते. भारत हा एक विकसनशील देश असल्याने, आपल्याकडे अजूनही अनेक वैज्ञानिक क्षेत्रे, जसे की अक्षय ऊर्जा, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती, इलेक्ट्रिक वाहने, सायबर भौतिक प्रणाली, क्वांटम तंत्रज्ञान, भविष्यातील वस्तुनिर्माण, नील अर्थव्यवस्था, किफायतशीर आरोग्य सेवा, इत्यादी, विकसित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ''इतर देशांमध्ये काम करणारा भारतीय समुदाय आपल्या ज्ञान आणि अनुभवाने भारतीय संशोधकांची क्षितिजे विस्तारण्यास सक्षम आहे, असा विश्वास आम्हाला वाटतो.'' असे करंदीकर यांनी सांगितले.

केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) विद्यावेतन कार्यक्रम राबवत आहे. या अंतर्गत एकूण 302 आवेदने आली. संबंधित संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ पुनरावलोकन समित्यांनी त्यांचे मूल्यांकन केले. त्यांच्या शिफारशींचे सर्वोच्च समितीकडून पुनरावलोकन करण्यात आले आणि 22 वैभव अधिछात्र (फेलो) आणि 2 विख्यात वैभव फेलोंची शिफारस करण्यात आली. वैभव अधिछात्र सहयोगासाठी एखादी भारतीय संस्था निश्चित करतील आणि जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी वर्षातला दोन महिन्यांचा कालावधी देऊ शकतील.
* * *
R.Aghor/B.Sontakke/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998918)
Visitor Counter : 120