रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम “पर्वतमाला परियोजने” अंतर्गत येत्या पाच वर्षात 1.25 लाख कोटी रुपये खर्चाचे 200 हून अधिक प्रकल्प निश्चित - नितीन गडकरी


एकूण प्रकल्प खर्च कमी करून आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देऊन रोपवे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्याचे गडकरी यांचे आवाहन

Posted On: 23 JAN 2024 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2024

 

राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम, “पर्वतमाला परियोजने” अंतर्गत येत्या पाच वर्षांत 1.25 लाख कोटी रुपये खर्चाचे 200 हून अधिक प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी दिल्लीत आज ‘रोपवे: परिषद आणि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी गडकरी बोलत होते. एकूण प्रकल्प खर्च कमी करून रोपवे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे आणि देशात रोपवेचे जाळे विकसित करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणे याला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. डोंगराळ भागात पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच,  शहरी सार्वजनिक वाहतुकीची मोठी क्षमता रोपवेमध्ये आहे असे सांगत सुरक्षिततेशी तडजोड न करता स्वदेशी आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. रोपवेमध्ये देशातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर सकारात्मक परिणाम करण्याची अपार क्षमता आहे, याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने,  भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले. कालबद्ध, किफायतशीर, दर्जेदार आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक दर्जाच्या’ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागरिकांचे ‘जीवन सुसह्य’ आणि प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित होतो, असे त्यांनी सांगितले. "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत रोपवेसाठीच्या घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन विद्यमान धोरणे आणि संहितेचे मानकीकरण करणे आणि रोपवे उद्योगात परिवर्तन करणे याला प्राधान्य असल्याचे गडकरी म्हणाले.

  

विविध भारतीय आणि जागतिक उत्पादक, तंत्रज्ञान प्रदाते, सवलती देणारे आणि पायाभूत सुविधा विकासक यांच्यातील उद्योग सहकार्य, सक्षम करणे हा ‘रोपवे: परिषद आणि  प्रदर्शन’’चा उद्देश होता. या कार्यक्रमाने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी आणि रोपवे घटकांच्या स्थानिकीकरणासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्यासाठी उद्योगांच्या विचारविनिमयासातही एक समान व्यासपीठ देखील प्रदान केले. रोपवे उद्योग क्षेत्र सुधारण्यासाठी आणि भारतात सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवताना सुरक्षित आणि परवडणारी रोपवे प्रणाली तयार करण्यासाठी उद्योग तज्ञांशी विविध चर्चासत्रे देखील या परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998907) Visitor Counter : 117


Read this release in: Hindi , English , Urdu