कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लाचखोरी प्रकरणातल्या आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास
Posted On:
17 JAN 2024 9:00PM by PIB Mumbai
मुंबई , 17 जानेवारी 2024
सोलापूरच्या (महाराष्ट्र) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा खटल्यातील विशेष न्यायाधीशांनी सोलापूरच्या कुर्डुवाडी येथील राखीव पोलीस दलाचे तत्कालीन कॉन्स्टेबल गणेश सातपुते याला पाच वर्षे सक्तमजुरीसह रु. 4,500/- दंड ठोठावला.
सीबीआयने या आरोपीविरुद्ध 29.04.2013 रोजी गुन्हा दाखल केला होता. आरोपीने टूर अँड ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून 10,000/- रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच या कंपनीने बुक केलेल्या रेल्वे तिकिटांवर प्रति प्रवासी रु. 100/- लाच मागून ती स्वीकारल्याचाही आरोप आरोपीवर आहे.
तपासाअंती आरोपीविरुद्ध 06.08.2023 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1997106)
Visitor Counter : 73