संरक्षण मंत्रालय
लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांचा नेपाळ दौरा
Posted On:
17 JAN 2024 5:55PM by PIB Mumbai
पुणे , 17 जानेवारी 2024
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंह AVSM, YSM, SM, VSM सात दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पहिल्या नेपाळ भेटीदरम्यान त्यांनी 16 जानेवारी 2024 रोजी काठमांडू येथील भारतीय दूतावासाला भेट दिली. लेफ्ट. जनरल सिंह यांनी राजदूत नवीन श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला आणि परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा केली.


लेफ्टनंट जनरल ए के सिंह यांनी 16 जानेवारी 2024 रोजी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील संरक्षण विभागाला देखील भेट दिली. या भेटीत त्यांना निवृत्तीवेतन, कल्याण, माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजना (ईसीएचएस) तसेच नेपाळचे रहिवासी असलेल्या निवृत्त गोरखा सैनिकांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे दस्तऐवजीकरण या सर्व बाबतीत माहिती देण्यात आली. लेफ्ट. जन सिंह यांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील अभिलेख कक्ष येथे निवृत्त सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांशी संवाद साधला तसेच नेपाळचे रहिवासी असलेल्या गोरखा सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संरक्षण शाखेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
M.Iyengar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1997021)
Visitor Counter : 81