सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्य कला मेळा 2024 चे नागपुरात उद्घाटन
12 ते 21 जानेवारी 2024 दरम्यान मेळ्याचे आयोजन
Posted On:
12 JAN 2024 7:22PM by PIB Mumbai
राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त आणि विकास महामंडळ (एनडीएफडीसी) च्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचा सक्षमीकरण विभागातर्फे (दिव्यांगजन){डीईपीडब्ल्यूडी} 12 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत नागपूरच्या रेशीमबाग मैदानात दिव्य कला मेळा आयोजित केला आहे. या 10 दिवसांच्या प्रदर्शनात देशभरातील दिव्यांग उद्योजक/कारागीर यांची उत्पादने आणि कलाकुसरीचे प्रदर्शन केले जाईल. ‘दिव्य कला मेळा’, सकाळी 11.00 ते रात्री 9.00 या वेळेत खुला असेल आणि दिव्यांगजन कलाकार आणि प्रसिद्ध व्यावसायिकांच्या सादरीकरणासह अनेक सांस्कृतिक उपक्रमांचा यात समावेश असेल.
नागपूर मधील दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी आमदार आणि राज्याच्या दिव्यांग कल्याण राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन माटे, आयएफएस, सीएमडी, एनडीएफडीसी नवीन शहा, नागपूरचे क्षेत्रीय दिव्यांगजन उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम अभ्यागतांना एक रोमांचक अनुभव देईल, कारण जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांतील प्रमुख उत्पादने एकाच ठिकाणी पाहता येतील. नागपुरात सुमारे 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 100 दिव्यांग कारागीर/कलाकार आणि उद्योजक त्यांच्या उत्पादने आणि कौशल्यांचे प्रदर्शन करतील. कार्यक्रमात अभ्यागतांना देशाच्या विविध प्रांतातील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.
शारीरिकदृष्ट्या अक्षम/दिव्यांगजनांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचा हा एक अनोखा उपक्रम आहे.
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995717)
Visitor Counter : 98