सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ

Posted On: 11 JAN 2024 7:40PM by PIB Mumbai

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (डी. ई. पी. डब्ल्यू. डी.) दिव्यांग व्यक्तींसाठी (पी. डब्ल्यू. डी.) परिवर्तनीय 70 तासांचा परस्परसंवादी रोजगार कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 'सक्षम भारत' सोबत करार केला आहे. डी. ई. पी. डब्ल्यू. डी. चे सचिव  राजेश अग्रवाल, यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अग्रगण्य अभ्यासक्रम दिव्यांगांसाठी रोजगाराच्या लाभदायी संधींमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

दिव्यांगांसाठी आशादायक आणि उज्ज्वल भविष्याची उद्घोषणा करणाऱ्या या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचा भव्य शुभारंभ पर्पल फेस्टमध्ये झाला. सर्वसमावेशक आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थितांनी हजेरी लावली.

या महत्त्वपूर्ण घोषणेव्यतिरिक्त, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने पोहोच मानकांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. भौतिक आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण पायाभूत सुविधांसाठी काळजीपूर्वक तयार केलेली ही मार्गदर्शक तत्त्वे विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी सर्वसमावेशकतेचा दीपस्तंभ म्हणून उभी आहेत. सरकारशी संबंधित सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्थांद्वारे मानके देशभरात स्वीकारली जातील. त्यामुळे प्रत्येकासाठी अधिक सुलभ वातावरण तयार होईल असे हे क्रांतिकारी पाऊल सुनिश्चित करते.

कला अकादमीच्या मुख्य सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमाद्वारे या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सुभाष फळ देसाई आणि राजेश अग्रवाल यांनी या परिवर्तनात्मक उपक्रमांचा यावेळी प्रारंभ केला. हा कार्यक्रम केवळ एक मैलाचा टप्पाच नाही तर सर्वांसाठी अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील दर्शवतो. या उपक्रमांचा परिणाम देशभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी पोहोच आणि रोजगारक्षमतेच्या क्षेत्रात कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याचे आश्वासन देतो.


*****

Nilima C/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995441) Visitor Counter : 90


Read this release in: English , Urdu , Hindi