पंचायती राज मंत्रालय
‘लिंग आधारित हिंसाचार दूर करण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह 9 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे करणार उद्घाटन
25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 200 हून अधिक लोक राष्ट्रीय कार्यशाळेत होणार सहभागी
Posted On:
08 JAN 2024 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 8 जानेवारी 2024
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह 9 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे लिंग-आधारित हिंसाचार दूर करण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत. ही कार्यशाळा पंचायत राज मंत्रालयाने यूएनएफपीए (संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोष) भारतच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
कार्यशाळेचा उद्देश लिंग आधारित हिंसाचाराशी संबंधित समस्या रोखणे आणि त्यांचे निराकरण करण्यात पंचायत राज संस्थांच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या भूमिकेवर चर्चा करणे आणि राज्य पंचायती राज विभाग, राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था , राज्य ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज, पंचायती राज प्रशिक्षण संस्था आणि पंचायतींमध्ये जागरूकता निर्मण करणे हा आहे. कार्यशाळेत बालविवाह, मानवी तस्करी, लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार यांसारख्या संवेदनशील समस्यांचा समावेश आहे. कार्यशाळेचे उद्दिष्ट लिंग-आधारित हिंसाचार दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांबाबत समज वृद्धिंगत करणे हे आहे. लिंग-आधारित हिंसाचारशी संबंधित प्रमुख क्षेत्रे समाविष्ट केल्यावर सहभागींना प्रतिबंधात्मक धोरणे, समर्थन व्यवस्था आणि सन्मान आणि समानतेच्या संस्कृतीला प्रोत्सहन देण्याच्या महत्वाबद्दल माहिती मिळेल.
गिरीराज सिंह उद्घाटन सत्राला संबोधित करतील. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेश कुमार सिंह, पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, सहसचिव विकास आनंद आणि यूएनएफपीए इंडियाच्या निवासी प्रतिनिधी एंड्रिया एम. वोजनर या देखील उद्घाटन सत्राला संबोधित करतील. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे पंचायती राज विभाग , राज्य ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज चे वरिष्ठ अधिकारी, पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी, पदाधिकारी आणि इतर हितधारक देखील दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत सहभागी होतील.
लिंग-आधारित हिंसाचार दूर करण्यात पंचायती राज संस्था/समुदाय आधारित संस्थांची भूमिका, तळागाळातील नागरी संस्थांना सहभागी करून लिंग-आधारित हिंसाचाराचे निराकरण करणे, महिला आणि मुलींशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका, तळागाळातील तस्करी, लिंग-आधारित हिंसेशी संबंधित समस्या कमी करण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात पंचायतींच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची भूमिका या विषयावर दिवसभराच्या कार्यशाळेत चर्चा केली जाईल.
कार्यशाळा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाच्या महिला-अनुकूल पंचायत विषयावरील ठोस प्रयत्नांना पुढे नेण्यास मदत करेल, जे तळागाळातील शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या दिशेने पंचायती राज मंत्रालयाने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तळागाळातील प्रशासनात महिला नेतृत्वाचे सक्षमीकरण करून, लैंगिक असमानता आणि लिंग-आधारित हिंसाचार दूर करून आणि लक्ष्यित उपक्रम राबवून, ग्रामीण समुदाय सर्वांसाठी अधिक न्याय्य आणि लवचिक भविष्य निर्माण करू शकतात. या प्रयत्नांचे यश हे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणाप्रति हितधारकांच्या सामूहिक वचनबद्धतेवर अवलंबून आहे.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994373)
Visitor Counter : 151