सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरेन्द्रनगर जिल्हा सहकारी बँक लिमिटेड च्या नवनिर्मित इमारतीचे केले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, लवकरच नवे सहकार धोरण देशभरात लागू केले जाईल; या धोरणाअंतर्गत देशातील सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवणूक योजनेसारख्या योजना राबवण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडा तयार केला जाईल
Posted On:
29 DEC 2023 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, सुरेन्द्रनगर जिल्हा सहकारी बँक लिमिटेड च्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सहकार धोरण लवकरच संपूर्ण देशात लागू केले जाईल, असे यावेळी केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले. या धोरणाअंतर्गत, जगातील सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवण योजनेसारख्या अनेक योजना चालवण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील 25 वर्षांसाठी सहकारासाठीचा आराखडा तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात सहकार क्षेत्रात देशात गुजरात पहिल्या क्रमांकावर राहील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1991647)
Visitor Counter : 113