कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
रोजगार मेळावे
Posted On:
20 DEC 2023 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2023
तरुणांसाठी रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने ‘रोजगार मेळावा ’ हे एक पाऊल आहे.
देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे आणि आणि विविध केंद्रीय मंत्रालये/विभाग/केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसयू)/आरोग्य आणि शिक्षण संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील बँका इ. या स्वायत्त संस्थांमध्ये नवीन नियुक्त्या दिल्या जात आहेत. विविध मंत्रालये/विभागांमध्ये रिक्त पदे भरणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सर्व रिक्त पदे मिशन मोडमध्ये भरली जात आहेत.
राज्यस्तरीय रोजगार मेळावे आणि राज्य सरकारांचे संबंधित विशिष्ट उपक्रम इत्यादींचे आयोजन संबंधित राज्य सरकारांकडून केले जाते.या उपक्रमांशिवाय, मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अभियान, कायापालट आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान, सर्वांसाठी घरे इत्यादीसारखे सरकारचे विविध प्रमुख कार्यक्रम, तरुणांसाठी देशव्यापी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने देखील केंद्रित आहेत.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तेवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1988925)
Visitor Counter : 115