ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएमजीएसवाय -1 योजनेची महाराष्ट्र राज्यातील प्रगती


महाराष्ट्रात अडीचशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 1,347 वाड्या आणि अडीचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 74 वाड्यांपर्यंत रस्ते सुविधा

Posted On: 19 DEC 2023 9:25PM by PIB Mumbai

मुंबई, 19 डिसेंबर 2023

 

ग्रामीण भागातील जनतेच्या उत्थानासाठी, ठराविक लोकसंख्येच्या आकाराच्या ज्या पात्र वाड्यांपर्यंत रस्त्यांची सोय झालेली नाही त्यांना रस्त्यांच्या प्रमुख जाळ्यामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागाला सर्व हंगामात सुरु राहतील अशा रस्त्यांनी जोडण्यासाठी हाती घेतलेला एक वेळचा विशेष उपक्रम  म्हणून पंतप्रधान ग्राम सडक योजनेची (पीएमजीएसवाय-1) सुरुवात करण्यात आली होती. या योजनेसाठी वर्ष 2001 मधील जनगणनेच्या आधारावर सपाट भूभागांवर 500 हून अधिक लोकसंख्या असलेल्या वाड्या आणि ईशान्येकडील राज्ये, हिमालयातील राज्ये आणि हिमालयीन केंद्रशासित प्रदेश यांसाठी अडीचशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाड्या असा निकष ठरवण्यात आला होता. या निकषामध्ये वाळवंटी प्रदेश (वाळवंट विकास कार्यक्रमात निश्चित केल्यानुसार), आदिवासी भाग (अनुसूचित 5) तसेच निवडक आदिवासी आणि मागासलेले जिल्हे (केंद्रीय गृह मंत्रालय आणि तत्कालीन योजना आयोगाने निश्चित केल्यानुसार) आणि 2001 च्या जनगणनेनुसार या भागांतील अडीचशे किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या पण रस्त्यांनी जोडले न गेलेल्या वाड्या यांना रस्त्यांच्या मुख्य जाळ्याशी जोडून घेण्यासाठी शिथीलता  देण्यात आली आहे. डाव्या विचारसरणीमुळे प्रभावित झालेल्या (केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार) महत्त्वाच्या ब्लॉक्सना निकषात अतिरिक्त सूट देण्यात आली असून 2001 च्या जनगणनेनुसार या भागांतील 100 किंवा त्याहून अधिक व्यक्ती राहत असलेल्या वाड्यांना रस्त्याने जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. पीएमजीएसवाय-1 अंतर्गत रस्त्यांची सुविधा देण्यासाठी महसुली गाव किंवा ग्राम पंचायत किंवा लहान खेडे हा निकष नसून वस्ती किंवा वाडी हा निकष आहे.

महाराष्ट्रात पीएमजीएसवाय अंतर्गत अडीचशेहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत 1,347 वाड्यांसाठी रस्ते मंजूर झाले आहेत त्यापैकी 1,340 वस्त्यांना याधीच रस्त्यांची सुविधा मिळाली आहे. शंभर ते 249 लोकसंख्येच्या वर्गात 74 वस्त्यांना योजनेचा लाभ मिळाला असून सर्वच वस्त्यांपर्यंत रस्त्यांची सोय झालेली आहे. पीएमजीएसवाय -1 अंतर्गत मंजूर रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च,2024 पर्यंत कालमर्यादा निश्चित केलेली आहे.

पीएमजीएसवाय अंतर्गत महाराष्ट्रातील मंजूर, जोडलेल्या आणि अद्यापि जोडल्या न गेलेल्या वस्त्यांचे जिल्हानिहाय तपशील (13 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार) खालील तक्त्यात दिला आहे:  

Sr. No.

District Name

Sanctioned

Connected

Balance

250+

100-249

Total

250+

100-249

Total

250+

100-249

Total

1

Ahmednagar

112

0

112

110

0

110

2

0

2

2

Akola

22

0

22

22

0

22

0

0

0

3

Amrawati

2

0

2

2

0

2

0

0

0

4

Aurangabad

20

0

20

20

0

20

0

0

0

5

Beed

16

0

16

16

0

16

0

0

0

6

Bhandara

0

0

0

0

0

0

0

0

0

7

Buldhana

36

0

36

36

0

36

0

0

0

8

Chandrapur

5

0

5

5

0

5

0

0

0

9

Dhule

80

0

80

80

0

80

0

0

0

10

Gadchiroli

50

73

123

50

73

123

0

0

0

11

Gondia

26

1

27

26

1

27

0

0

0

12

Hingoli

28

0

28

28

0

28

0

0

0

13

Jalgaon

0

0

0

0

0

0

0

0

0

14

Jalna

12

0

12

12

0

12

0

0

0

15

Kolhapur

27

0

27

27

0

27

0

0

0

16

Latur

3

0

3

3

0

3

0

0

0

17

Nagpur

4

0

4

4

0

4

0

0

0

18

Nanded

14

0

14

14

0

14

0

0

0

19

Nandurbar

161

0

161

157

0

157

4

0

4

20

Nashik

136

0

136

136

0

136

0

0

0

21

Osmanabad

10

0

10

10

0

10

0

0

0

22

Parbhani

7

0

7

7

0

7

0

0

0

23

Pune

71

0

71

71

0

71

0

0

0

24

Raigad

41

0

41

40

0

40

1

0

1

25

Ratnagiri

50

0

50

50

0

50

0

0

0

26

Sangali

58

0

58

58

0

58

0

0

0

27

Satara

66

0

66

66

0

66

0

0

0

28

Sindhudurg

29

0

29

29

0

29

0

0

0

29

Solapur

6

0

6

6

0

6

0

0

0

30

Thane

30

0

30

30

0

30

0

0

0

31

Wardha

16

0

16

16

0

16

0

0

0

32

Washim

3

0

3

3

0

3

0

0

0

33

Yavatmal

19

0

19

19

0

19

0

0

0

34

Palghar

187

0

187

187

0

187

0

0

0

Total

1,347

74

1,421

1,340

74

1,414

7

0

7

 

या  कार्यक्रमाच्या https://omms.nic.in/ या संकेतस्थळावर पीएमजीएसवाय अंतर्गत वस्त्यांचे, जिल्हानिहाय आणि वर्षनिहाय तपशील उपलब्ध आहेत.

लोकसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज ही माहिती दिली.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988464) Visitor Counter : 99


Read this release in: English