ग्रामीण विकास मंत्रालय

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रात 5000 हून अधिक ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण

Posted On: 19 DEC 2023 8:10PM by PIB Mumbai

मुंबई, 19 डिसेंबर 2023

 

महाराष्ट्रामध्‍ये , ग्रामीण भागातील 5977  युवकांना आर्थिक वर्ष 2022-23  मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत  (डीडीयू-जीकेवाय) कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.  तर  या आर्थिक वर्षामध्‍ये  नोव्हेंबर 2023 पर्यंत 2710  तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. डीडीयू-जीकेवाय कौशल भारत पोर्टल नुसार, 2020-21 आणि 2021-22 मध्ये अनुक्रमे 874 आणि 348 ग्रामीण युवकांना डीडीयू-जीकेवाय अंतर्गत प्रशिक्षण दिले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात 66 सक्रिय प्रकल्प अंमलबजावणी एजन्सी आणि 71 कौशल्य-प्रशिक्षण केंद्रे आहेत.

या योजनेविषयी राज्याकडून  प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये डीडीयू-जीकेवाय अंतर्गत गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात (नोव्हेंबर 2023 पर्यंत) कौशल्य प्राप्त केलेल्या  (प्रशिक्षित) उमेदवारांची  संख्या खालीलप्रमाणे आहे:

अनुक्रम

जिल्हा

गेल्या तीन वर्षात प्रशिक्षित झालेले उमेदवार- संख्या

यावर्षी प्रशिक्षित झालेले उमेदवार- संख्‍या

1

सांगली

51

10

2

परभणी

300

24

3

 गोंदिया

768

106

4

सातारा

284

15

5

सोलापूर

231

93

6

लातूर

155

76

7

उस्मानाबाद

311

24

8

औरंगाबाद

734

107

9

वाशिम

117

84

10

हिंगोली

184

20

11

रत्नागिरी

16

0

12

पालघर

112

0

13

रायगड

119

0

14

भंडारा

557

197

15

 जळगाव

646

74

16

चंद्रपूर

357

32

17

अमरावती

564

190

18

अहमदनगर

403

155

19

यवतमाळ

256

133

20

नागपूर

430

3

21

जालना

803

154

22

 पुणे

232

0

23

अकोला

228

135

24

धुळे

612

105

25

नांदेड

527

169

26

कोल्हापूर

60

97

27

 सिंधुदुर्ग

18

2

28

नाशिक

634

258

29

 वर्धा

397

127

30

नंदूरबार

299

157

31

बीड

395

78

32

ठाणे

90

0

33

गडचिरोली

347

26

34

बुलढाणा

129

24

 

एकूण

11366

2675

 

डीडीयू-जीकेवाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्रांमध्‍ये प्रशिक्षण  देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही कमतरता नाही.

या  संदर्भामध्‍ये ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज लोकसभेत एका अ-तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988431) Visitor Counter : 57


Read this release in: English