पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैद्यकीय पर्यटन केंद्राचा विकास

Posted On: 18 DEC 2023 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

भारतात गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात आलेल्या वैद्यकीय पर्यटकांची संख्या खालीलप्रमाणे :

 

Year

Medical Tourists (in lakh)

2020

1.83

2021

3.04

2022

4.75

 2023* (Jan-Oct)

5.04

*Provisional

Source: Bureau of Immigration

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिल्याप्रमाणे, भारताने, वैद्यकीय पर्यटनविषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि कोविड-19 मुळे फटका बसलेल्या, पर्यटन उद्योगातील कंपन्यांना नव्याने सुरुवात करण्यासाठी, खेळते भांडवल किंवा वैयक्तिक कर्ज स्वरूपात  देण्याची घोषणा केली आहे. सर्व प्रमुख कंपन्या आणि रुग्णालयांनी आता अद्ययावत रुग्णालये बांधण्यावर भर दिला आहे. अपोलो, मॅक्स रुग्णालये, आशियाई, शाल्बी, फोर्टिस रुग्णालये, मणिपाल समूह अशा रुग्णालयांनी जी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये गुंतवणूक केली आहे. दंत प्रत्यारोपण, सौंदर्यप्रसाधन शस्त्रक्रिया, ज्या आधी, वेळ आणि अंतरामुळे लवकर होत नव्हत्या, त्या शस्त्रक्रिया आता, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये देखील केल्या जात आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनएबीएच)  अशा आरोग्य सेवा संस्थांना मान्यता प्रदान करते.

पर्यटन मंत्रालयाने, नोव्हेंबर 2020 पासून, देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यटन विकास सहाय्यक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधे सुधारणा केली असून, त्याद्वारे, या योजनेची व्याप्ती आणि आवाका वाढवण्यात आला आहे. या सुधारणांचा लाभ, सर्व भागधारकांसह, वैद्यकीय पर्यटन सेवा प्रदात्यांना देखील मिळत आहे. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार विकास सहाय्य (एमडीए) अंतर्गत प्रदान केलेल्या आर्थिक मदतीचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

S. No.

Year

Amount Released (in Rs.)

1

2021-22

6,86,237

2

2022-23

7,06,668

3

2023-24(till 14.12.2023)

6,44,213

 

Total

20,37,118

 

देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला आहे.

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987974) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu