ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळ(FCI) उपलब्धता वाढवण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी ई-लिलावांच्या माध्यमातून गहू आणि तांदळाचा साठा बाजारात आणत आहे
Posted On:
15 DEC 2023 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
भारतीय अन्न महामंडळाकडे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) मागणीची पूर्तता करण्यासाठी त्याचबरोबर बाजारात हस्तक्षेपासाठी अन्नधान्याचा (गहू आणि तांदूळ) पुरेसा साठा आहे. 14.12.2023 रोजी केंद्रीय भांडारात खालीलप्रमाणे अन्नधान्य उपलब्ध आहे.
अनुक्रमांक
|
वस्तू
|
साठा स्थिती (एलएमटीमध्ये)
(14.12.23रोजी)
|
1
|
गहू
|
181.79
|
2
|
तांदूळ
|
182.86
|
3
|
एकूण
|
364.65
|
*चालू खरीप हंगाम 2023-24 मध्ये, 237.43 LMT तांदूळ मिळेल इतक्या 354.22 LMT धानाची आतापर्यंत खरेदी झाली आहे.
खुल्या बाजारात गहू आणि तांदूळ यांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि महागाईचे चढे कल रोखण्यासाठी भारत सरकारच्या निर्देशांनुसार भारतीय अन्न महामंडळ ई-लिलावांच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ खुल्या बाजारात उतरवत आहे. गव्हाचा साठा खुल्या बाजारात आणण्याच्या सध्याच्या टप्प्याला 28 जून 2023 पासून सुरुवात झाली.
गहू
भारत सरकारने ओएमएसस(डी) अंतर्गत बाजारात आणण्यासाठी 101.5 LMT गहू पुरवला आहे. एफएक्यू गहू आणि यूआरएस गहू यांसाठी राखीव दर अनुक्रमे रु. 2150/ क्विंटल आणि रु. 2125/क्विंटल ठेवण्यात आले आहेत. 14.12.23 पर्यंत एकूण 25 ई-लिलाव झाले असून त्याद्वारे खुल्या बाजारात 48.12 LMT गव्हाची विक्री झाली आहे.
या व्यतिरिक्त भारत सरकार नाफेड/एनसीसीएफ/ केंद्रीय भांडार/एमएससीएमएफएल यांसारख्या निमसरकारी/ सहकारी संस्थांना देखील पीठ दळण्यासाठी रु. 21.50/किलो दराने आणि त्या पिठाची सर्वसामान्य जनतेला रु. 27.50/किलो कमाल किरकोळ दराने विक्री करण्यासाठी गहू उपलब्ध करून देत आहे. 14.12.23 पर्यंत या संस्थांनी 86084 MT गव्हाची उचल केली आहे.
तांदूळ:
चांगली खरेदी आणि एफसीआयकडे असलेला तांदळाचा साठा यांचा वापर पीडीएस च्या गरजेसाठी त्याबरोबरच बाजार हस्तक्षेपासाठी केला जाणार आहे.
भारत सरकारने ओएमएसस(डी) अंतर्गत बाजारात आणण्यासाठी रु. 3100/क्विंटल या राखीव दराने 25 LMT तांदूळ गहू पुरवला आहे. ई-लिलावाच्या माध्यमातून रु. 2900/क्विंटल या दराने हा तांदूळ दिला जात आहे, ज्यामध्ये रु.200/क्विंटल हा दरातील फरक दर स्थिरीकरण निधीद्वारे भरून काढला जात आहे.
यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, 14.12.23 पर्यंत खुल्या बाजारात खाजगी व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांना 1.19 LMT तांदळाची विक्री करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. एफसीआय प्रादेशिक कार्यालयांनी सातत्याने केलेल्या जाहीरातींच्या माध्यमातून या उपक्रमाची लोकप्रियता वाढवण्यासाठी सक्रीय प्रयत्न केले आहेत.
केंद्रीय भांडारांतर्गत वितरित केला जाणारा तांदूळ उत्तम प्रतीचा आहे आणि ग्राहकांना बाजारात हा तांदूळ सहजतेने आणि परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करण्यासाठी ई-लिलावात सक्रीय सहभाग घेण्यासाठी व्यापाऱ्यांना आमंत्रित केले जात आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986903)
Visitor Counter : 107