अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लॉटरी वितरकांकडून कर चुकवेगिरी


जुलै 2017 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान लॉटरी वितरकांकडून जीएसटी चुकवेगिरीच्या 12 प्रकरणांमध्ये 344.57 कोटी रुपये जप्त आणि 621.56 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2023 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

औपचारिक बँकिंग प्रणाली द्वारे लॉटरीच्या बक्षीस रकमेचे वितरण करण्याबाबत मिळालेल्या माहिती बाबतच्या टिप्पण्या गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, मजबूत बँकिंग प्रणाली आणि विनियमित संस्थांचे प्रभावी नियमन/पर्यवेक्षण लक्षात घेता संबंधित मनी लाँडरिंग/दहशतवादी वित्तपुरवठा/निधी पुरवठ्याशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी, लॉटरी बक्षीस वितरणासह कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी औपचारिक बँकिंग प्रणाली उपयुक्त ठरेल.

लॉटरी वितरकांकडून होणार्‍या कर चुकवेगिरीच्या प्रश्नावर ते  म्हणाले की, करदात्याशी संबंधित प्रत्यक्ष कर कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनाची कोणतीही विश्वासार्ह/गुप्त माहिती मिळाल्यावर, आयकर विभाग करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करतो. यामध्ये प्रत्यक्ष कर कायद्यांतर्गत, तरतुदींनुसार जिथे जिथे लागू असेल तिथे चौकशी करणे, शोध आणि जप्ती किंवा सर्वेक्षण कारवाई, मूल्यांकन आणि प्रत्यक्ष कृती याचा समावेश आहे. लै, 2017 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत लॉटरी वितरकांविरोधात जीएसटी चुकवेगिरीच्या बारा प्रकरणांमध्ये लॉटरी वितरकांकडून  344.57 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, आणि  621.56 कोटी रुपये  (व्याज आणि दंडासह) जप्त/वसूल करण्यात आले आहेत.


S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1985245) आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी