उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी आयआयटी धनबादच्या 43 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2023 8:39PM by PIB Mumbai
उच्च शैक्षणिक संस्था केवळ बुद्धीचे मेरू नसून आर्थिक वाढीचे शक्तिशाली इंजिन म्हणून महत्त्वाचे आहेत या भूमिकेवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भर दिला आहे. शिक्षण ही समाजातील परिवर्तनाची सर्वात प्रभावी यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांना पुरविल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेशी एक राष्ट्र अत्यंत घनिष्ठपणे जोडलेले असते यावरही उपराष्ट्रपतींनी भर दिला.
धनबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) च्या वार्षिक दीक्षांत समारंभाला संबोधित करताना आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्राच्या विकासात राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. जेव्हा भारताचा विचार केला जातो तेव्हा राष्ट्राच्या कल्याणाबाबत राजकीय पक्षांमध्ये कोणताही मतभेद असू शकत नाहीत, हे उपराष्ट्रपतींनी याप्रसंगी अधोरेखित केले.
आयआयटी सारख्या संस्थांना बदलाचा मार्ग म्हणून संबोधत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताला जागतिक तंत्रज्ञान नेतृत्व बनवण्यात या संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. आपण एका अशा तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत जी आपली जीवनशैली, कार्य आणि सामाजिक संवादात मूलभूत परिवर्तन घडवेल असेही त्यांनी सांगितले.
कायदे, महिला आरक्षण आणि पायाभूत धोरणे यातील या कालखंडातील उपलब्धी पाहता आपला अमृत काळ हा आपला गौरव काळ आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.


***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984822)
आगंतुक पटल : 101