निती आयोग
आकांक्षी तालुका कार्यक्रमाअंतर्गत पहिली डेल्टा क्रमवारी नीती आयोगाने केली जाहीर
तेलंगणातील आसिफाबाद जिल्ह्यातल्या तिरियानी कुमुरम भीम तालुका अव्वल स्थानी तर उत्तरप्रदेशातील कौशांबी तालुका क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
Posted On:
07 DEC 2023 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत, नीती आयोगाने आज पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारी तेलंगणातल्या आसिफाबाद जिल्ह्यातील तिरियानी कुमुरम भीम तालुका अव्वल स्थानी आहे, तर दुसऱ्या स्थानावर, उत्तरप्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातला कौशांबी तालुका आहे.नीती आयोगाने, दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या एका कार्यक्रमात ही क्रमवारी जाहीर केली. या कार्यक्रमात देशभरातील 300 आकांक्षी जिल्हे आणि 500 आकांक्षी तालुके सहभागी झाले होते.
जून 2023 या महिन्यात, विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणी आणि कामगिरीच्या निकषांच्या आधारावर, या तालुक्यांची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. आणि महत्वाच्या क्षेत्रातील कामगिरीचे हे निकष, तालुक्यांमधील स्पर्धात्मक भावना तसेच सहकार्यात्मक संघराज्य भावनेच्या आधारावर ठरवले जातात. आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत, पहिल्यांदाच तालुक्यांच्या प्रगती निकषांवर अशी कामगिरी निश्चित करण्यात आली आहे.
या एबीपी क्रमवारी सोबतच, ऑक्टोबर महिन्यासाठी, एडीपी म्हणजेच, आकांक्षी जिल्हा क्रमवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. यात, अनुक्रमे रायगड (ओडिशा) आणि जमुई (बिहार) या जिल्ह्यानी बाजी मारली आहे. संकल्पनात्मक आणि एकूण कामगिरीच्या आधारावर अव्वल स्थानी असलेल्या आकांक्षी जिल्हयाचा यावेळी गौरव करण्यात आला.
आणखी एक अभिनव उपक्रम राबवत, एबीपी आणि एडीपी अंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा आणि तालुक्यांची कामगिरी, नीती आयोगाच्या वॉल ऑफ फेम या प्रसिद्धी फलकावर झळकवली जाणार आहे.
नीती आयोगाच्या सदस्यांसह, उपाध्यक्षांनी या वॉल ऑफ फेमचे उद्घाटन केले. द वॉल ऑफ फेम वर, 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या दृष्टीकोनासह आकांक्षी ब्लॉक्स कार्यक्रम आणि आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाचे प्रमुख टप्पे अधोरेखित केले जाणार आहेत. देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे आकांक्षी तालुके आणि आकांक्षी जिल्ह्यांच्या यशाचा उत्सव या फलकावर साजरा केला जाणार आहे. तसेच, सक्षमीकरण, उत्थान आणि लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा आणि तालुक्यात राबवण्यात आलेल्या यशोगाथा, प्रेरणा कथा देखील झळकवल्या जाणार आहेत.
या तालुक्यांचे विभाजन सहा क्षेत्रीय भागात करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन तालुक्यांना क्रमवारी देण्यात आली आहे. पहिल्या क्षेत्रात, डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्ये तसेच बेटांचा समावेश आहे, प्रथम आणि द्वितीय क्रमांक अमरी तालुका, पश्चिम कार्बी आंगलाँग, आसाम आणि एनगोपा तालुके, सैच्युअल मिझोराम यांना मिळाला आहे. दुसऱ्या प्रदेशात, ज्यामध्ये उत्तर भारतीय राज्यांचा समावेश आहे, त्यात, हरैया तालुका, बस्ती, उत्तर प्रदेश आणि विरनो तालुका, गाझीपूर, उत्तर प्रदेश यांनी प्रथम आणि द्वितीय स्थान प्राप्त केले. दक्षिणेकडील राज्यांचा समावेश असलेल्या झोन 3 मध्ये, मस्की तालुका, रायचूर, कर्नाटक आणि नारनूर, आदिलाबाद, तेलंगणा यांना क्रमवारीत सर्वोत्तम घोषित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील क्षेत्र 4 मधील, सिरोंचा आणि अहेरी तालुक्याचा समावेश असलेल्या पश्चिम भारतातील राज्यांमध्ये, महाराष्ट्र विजेता ठरला. क्षेत्र, 5 अंतर्गत मध्य भारतात धार जिल्ह्याचा तिर्ला तालुक्या आणि मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्याचा पाट तालुका हे दोन्ही विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. क्षेत्र 6 मध्ये समाविष्ट असलेल्या पूर्व भारतात आंदर, सिवान, बिहार आणि दुमका, झारखंडमधील रामगढ हे अव्वल क्रमांकावर आहेत.
सर्व विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व श्रेणींमध्ये अव्वल क्रमांकासाठी 3 कोटी आणि द्वितीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी होटे. नीती आयोगाचे सदस्य, प्रा. रमेश चंद, डॉ. व्ही.के. पॉल आणि डॉ. अरविंद विरमानी आणि नीती आयोगाचे सीईओ, बी.व्ही.आर सुब्रह्मण्यम देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983834)
Visitor Counter : 279