वस्त्रोद्योग मंत्रालय

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते पंकज त्रिपाठी करणार कस्तुरी कॉटन भारत उपक्रमाचा प्रसार

Posted On: 02 DEC 2023 8:49PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने नुकतीच कस्तुरी कॉटन भारत उपक्रमाची घोषणा केली. भारतीय कॉटनसाठी नवीन मानकांनुसार एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. त्यामुळे भारतीय कापूस उद्योगात आमूलाग्र परिवर्तन होऊ शकेल. उच्च दर्जाच्या ग्वाहीबरोबरच शेतकऱ्यांसह मूल्य साखळीतील प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम प्रयत्नशील असून त्यामुळे अधिक चांगले फायदे तर मिळतीलच शिवाय जागतिक पातळीवर भारतीय कापूस उद्योगाची एक ओळख निर्माण होईल. कस्तुरी कॉटन हे फक्त उत्पादन नाही तर शेती ते  सूत, ते कारखान्यात नेल्यावर त्यातून फॅशनचे दर्जेदार कपडे तयार करून ते परदेशात निर्यात करणे या 5 F तत्त्वांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेते पंकज त्रिपाठी हे या कस्तुरी कॉटन उपक्रमाचे प्रसारदूत म्हणून लाखों लोकांसमोर उपक्रम  पोहोचवणार आहेत. त्यामुळे भारतीय कापूस उद्योगाला जागतिक दर्जा गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. जागतिक मानके आणि कापूस उत्पादनात शाश्वततेलाही त्यामुळे चालना मिळेल.

त्याचबरोबर त्रिपाठी यांच्या सहभागामुळे हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय उपक्रम एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचेल. केंद्र सरकारचे  वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महामंडळ  आणि टेक्सप्रोसिल यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाला त्रिपाठी यांच्या सहभागामुळे   मदत होणार आहे.

शेतकरी पार्श्वभूमीत वाढलेल्या माझ्यासारख्या माणसाचा या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा आहे. या उपक्रमामुळे कपास लागवडीतून अधिक उत्पन्न मिळेल. त्यामुळे या उद्योगातले शेतकरी आणि इतरांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल. तसेच जगाला हवे असलेले अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन या उपक्रमामुळे झाले तर ती आपल्या देशासाठी अभिमानाची बाब ठरेल ”,  अशा भावना त्रिपाठी यांनी व्यक्त केल्या.

सविस्तर तपशील आणि माहिती कस्तुरी कॉटनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. website www.kasturicotton.com

 

भागीदारांबद्दल:

टेक्सप्रोसिल: 1954 मध्ये स्थापना झालेली आणि  वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही सर्वोच्च संस्था आहे. जागतिक स्तरावर 150 पेक्षा जास्त देशांना सेवा देणार्‍या भारतीय कापूस कापड उत्पादनांच्या निर्यातीचे नेतृत्व केले.

सीसीआय: सीसीआय ही 1970 मध्ये स्थापन झालेली एक मिनी रत्न कंपनी आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली कापूस उत्पादक शेतकरी आणि वस्त्रोद्योगाला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1982021) Visitor Counter : 73


Read this release in: English