संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल प्रवीण केशव वोहरा यांनी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून स्वीकारला पदभार
Posted On:
01 DEC 2023 5:09PM by PIB Mumbai
एअर मार्शल प्रवीण केशव वोहरा यांनी 01 डिसेंबर 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी (एसएएसओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
एअर मार्शल हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत आणि 19 डिसेंबर 1987 रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी प्रामुख्याने मिग-21- या विमानाच्या विविध आवृत्ती आणि मिग-29 विमाने यांच्या 3500 हून अधिक तासांच्या उड्डाणाद्वारे आपल्या देशाच्या सर्व भागांत सेवा दिली आहे.
अ श्रेणीचे पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर असणारे वोहरा यांनी विंग कमांडर म्हणून, 47 क्रमांकाच्या 'द ब्लॅक आर्चर्स' या स्क्वाड्रनची धुरा सांभाळली होती जिचे ते आता कमोडोर कमांडंट आहेत. 2014 ते 2017 पर्यंत ते हलवारा एअरफोर्स स्टेशनचे एअर ऑफिसर कमांडिंग होते. ते 'सूर्यकिरण' या स्वदेशी किरण एमके-II विमानावरील भारतीय वायुसेनेच्या फॉर्मेशन एरोबॅटिक टीमच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी डायरेक्टर ऑपरेशन्समधील महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे कार्य केले आहे, तसेच त्यांनी एअर चीफचे एअर असिस्टंट म्हणून आणि हवाई मुख्यालयात सहाय्यक एअर स्टाफ (ऑपरेशन्स) ची जबाबदारी सुद्धा पार पडली आहे.
ते वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील सेंटर ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज येथून पदवीधर आहेत. वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी वेस्टर्न एअर कमांड म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे एअर ऑफिसर कमांडिंग होते.
एअर ऑफिसर प्रवीण वोहरा यांना देशासाठी केलेल्या विशिष्ट सेवेसाठी ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘वायू सेना पदक’ प्राप्त झाले आहे. त्यांचे लग्न नविता अर्जुन वोहरा यांच्याशी झाले असून त्यांना एक मुलगा आहे.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981880)
Visitor Counter : 96