माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यात 54 व्या इफ्फीमध्ये 'एंडलेस समर सिंड्रोम' या फ्रेंच चित्रपटाचा उद्या आशियाई प्रीमियर होणार
एका महिला कुटुंब प्रमुखांवर केंद्रित कथानकाने मी प्रभावित झाले आणि मला चित्रपट निवडण्यास प्रवृत्त केले: सहाय्यक निर्माती लिंडसे टेलर स्टुअर्ट
हा चित्रपट इतरांना अधिकाधिक महिला केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित करेल: अभिनेत्री फ्रेडरिका मिलानो
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2023
‘एंडलेस समर सिंड्रोम’ चित्रपटाच्या कलाकार आणि इतर चमूने आज गोव्यात 54 व्या इफ्फी मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. चेक प्रजासत्ताकमधील फ्रेंच भाषिक चित्रपटाचा उद्या, 28 नोव्हेंबर रोजी इफ्फी मध्ये आशियाई प्रीमियर होणार आहे.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना सहाय्यक निर्माती लिंडसे टेलर स्टुअर्ट म्हणाल्या , “हा चित्रपट फ्रेंच सिनेमाला आदरांजली आहे. दिग्दर्शक कावेह दानेशमंद यांचा संदेश देताना त्या म्हणाल्या की, या चित्रपटावर लेखक किंवा दिग्दर्शकाने आपली प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रेक्षकांनी चित्रपट अनुभवावा अशी दिग्दर्शकाची इच्छा आहे.
चित्रपटाच्या निर्मितीतील आव्हानांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की हा चित्रपट कोविड महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय कलाकार आणि तंत्रज्ञांनी तयार केला होता.
तिच्या या चित्रपटाच्या निवडीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सहाय्यक निर्माती लिंडसे टेलर स्टुअर्ट म्हणाली की ती एका महिला कुटुंब प्रमुखांवर केंद्रित कथानकाने प्रभावित झाली आहे.
हा चित्रपट एक वकील आणि दोन मुलांच्या आईची कथा आहे ज्यांचे फ्रान्समधील सुखी कौटुंबिक जीवन तिच्या पतीच्या निष्ठेबद्दल अनिष्ट दूरध्वनी आल्यानंतर कोलमडून पडते. जो कौटुंबिक बंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा चित्रपट आहे आणि कौटुंबिक नाट्यशैलीत गुंतागुंत आणि बारकावे दर्शवतो.
आपला अनुभव आणि चित्रपटातील स्त्री पात्रांबद्दल माहिती देताना, अभिनेत्री फ्रेडरिका मिलानो म्हणाली, "चित्रपटातील प्रमुख भूमिका एका महिलेने साकारली आहे आणि चित्रपटात पूर्वीच्या काळातील महिलांचे जसे चित्रण केले जायचे तसे केलेलं नाही."
चित्रपटातील मुख्य पात्र डेल्फीनबद्दल बोलताना ती म्हणाली की डेल्फीन एक कणखर , स्वतंत्र स्त्री आहे जी संपूर्ण कुटुंब स्वतःच सांभाळते.
केवळ कलाकारच नाही तर संपूर्ण चमूमध्ये बहुसंख्य महिला होत्या आणि चित्रपटाच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्येकाचे मत विचारात घेतले होते. एंडलेस समर सिंड्रोम हा चित्रपट इतरांना अधिकाधिक महिला केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रेरणा देईल अशी आशा तिने व्यक्त केली.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना अभिनेत्री सोफी कोलन म्हणाली, "महिला पात्रे उभी करण्यासाठी गतिशील जटिल मार्ग शोधण्यासाठी हा चित्रपट लिहिला गेला आहे आणि सहकार्य करण्यात आले आहे".
हा रंजक चित्रपट प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवण्यासाठी सज्ज आहे . त्यांच्या मनात भावनांचे कोलाहल माजते जसजसा चित्रपट आधुनिक समाजाच्या सीमांना तडा देतो आणि कौटुंबिक प्रेमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. 98 मिनिटे कालावधीचा एंडलेस समर सिंड्रोम हा चित्रपट जागतिक सिनेमा विभागातील आंतरराष्ट्रीय सिनेमा अंतर्गत दाखवला जाईल.
कलाकार आणि सहाय्यक चमू
दिग्दर्शक: कावेह दानेशमंद
निर्माते : जेम डेगर, कावेह दानेशमंद, सेड्रिक लार्व्होअर, इवा लार्व्होअर, जॉर्डी निउबो, लिंडसे टेलर स्टुअर्ट (सहाय्यक निर्माता)
पटकथा: लॉरीन बॉबी, कावेह दानेशमंद, जेम देगर
डीओपी : सेद्रिक लारवोईर
संकलक: फ्रँकोइस डेल रे, पियरे डेल रे
कलाकार: सोफी कोलन, मॅथियो कॅपेली, जेम डेगर, फ्रेडेरिका मिलानो, रोलँड प्लांटिन
हा संवाद इथे पहा :
* * *
PIB Mumbai | JPS/S.Kane/D.Rane
(Release ID: 1980346)
Visitor Counter : 90