ऊर्जा मंत्रालय
'पीआरएसआय राष्ट्रीय पुरस्कार 2023' च्या 'वार्षिक अहवाल' श्रेणी अंतर्गत एनएचपीसी ने मिळवला द्वितीय पुरस्कार
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2023 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023
एनएचपीसी लिमिटेड, या भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनीने 'पीआरएसआय राष्ट्रीय पुरस्कार 2023' च्या 'वार्षिक अहवाल' श्रेणी अंतर्गत दुसरे पारितोषिक पटकावले आहे. पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) द्वारे नवी दिल्ली येथे 25 ते 27 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एनएचपीसी वार्षिक अहवाल 2022-23 ची एकूण उच्च-गुणवत्ता, मांडणी आणि डिझाइन यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

छायाचित्र: एनएचपीसी चे संचालक (कार्मिक) उत्तम लाल, ' पीआरएसआय राष्ट्रीय पुरस्कार 2023' मध्ये, 'वार्षिक अहवाला' साठी, एनएचपीसी ने प्रदान केलेल्या ट्रॉफी सह*
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1980034)
आगंतुक पटल : 139