माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फी मध्ये आयोजित संवाद सत्रात ब्रेंडन गॅल्विन आणि तरसेम सिंग यांनी प्रेक्षकांशी साधला संवाद
चित्रपट निर्मिती ही जाणीवपूर्वक निवड असून तो बनवता येत नाही: चित्रपट दिग्दर्शक तरसेम सिंग
उत्कृत्ष्ट पटकथेपासून नेहमीच चांगला चित्रपट बनत नाही: ब्रेंडन गॅल्विन
गोवा/मुंबई, 25 नोव्हेंबर 2023
ख्यातनाम आयरिश छायांकनकार (सिनेमॅटोग्राफर), ब्रेंडन गॅल्विन आणि भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माता तरसेम सिंग यांनी आज गोव्यामध्ये तरुण उदयोन्मुख चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट रसिकांसमोर चित्रपट निर्मितीची कला आणि आजचे सृजनशील जग, याविषयी आपले विचार मांडले. 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आयोजित कला अकादमीच्या संवाद सत्रात ते बोलत होते.
आपल्या दिमाखदार कारकिर्दीवर विचार मांडताना, तरसेम यांनी, चित्रपट निर्मात्यांकडे एक वेगळा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे, यावर भर दिला. “उत्कृष्ट पटकथेवरून नेहमीच उत्कृष्ट चित्रपट बनतो, असे नाही. प्रत्येक चित्रपटाची भाषा वेगळी असते", असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये द सेल, द फॉल, इमॉर्टल्स, मिरर मिरर आणि सेल्फ/लेस या चित्रपटांचा समावेश आहे.
व्यावसायिक सिनेमा बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तरसेम यांनी, कथनाची खोलवर जाणीव असणे, ही चित्रपट बनवणाऱ्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, “चित्रपट बनवत आहोत, असा भ्रम उपयोगाचा नाही. हा केवळ शो बिझनेस नसून, बिझनेस शो आहे.” बनावट क्षमतेपेक्षा जाणीवपूर्वक निवड महत्वाची आहे, असे ते म्हणाले.
“नवीन गोष्ट सांगण्यासाठी दर वेळी नव्या आशयाचा शोध घ्या”, असे सांगून तरसेम यांनी जाणीवपूर्वक निवड आणि निर्णय, भाषेची तरलता आणि प्रत्येक चित्रपटात नवा शोध घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
भारतीय चित्रपटांच्या निर्मिती संस्थांबाबतची आपली निरीक्षणे नोंदवताना ते म्हणाले की, प्रतिभावंत चित्रपट निर्मात्यांच्या महत्वाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्रवृत्ती, चित्रपट उद्योगाच्या सृजनशील प्रक्रियेला बाधा आणणारी आहे.
छायाचित्र: भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माता तरसेम सिंग संवाद सत्राला संबोधित करताना
ख्यातनाम आयरिश सिनेमॅटोग्राफर ब्रेंडन गॅल्विन यांनी, आपल्या बिहाइंड एनीमी लाइन्स, वेरोनिका ग्वेरिन आणि फ्लाइट ऑफ द फिनिक्स यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांच्या दृश्यात्मक कथाकथनाचा पट उलगडला. ते म्हणाले, “एक उत्तम पटकथा नेहमीच उत्तम चित्रपटाची हमी देत नाही.” ब्रेंडन म्हणाले की, विश्वासार्हता जपण्यासाठी स्वतःचे काही नियम असायला हवेत. चित्रपट बनवताना अनुकरण टाळून नाविन्यतेचा ध्यास घेणे महत्वाचे असून, चित्रीकरण करताना प्रेक्षकांचा दृष्टीकोन लक्षात घेऊन, पारंपरिक संकल्पनांना आव्हान द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले, “कलात्मक प्रतिभा सिद्ध करण्यासाठी नियम विसरून जाण्यासाठी शिकावेत.” सहयोगामध्ये वैयक्तिक हेतू बाजूला ठेवणे महत्वाचे असल्याचे सांगताना ब्रेंडन म्हणाले, “कलात्मक अभिव्यक्तीसाठी, अहंकार आणि वैयक्तिक उद्दिष्ट बाजूला ठेवणे खूप महत्वाचे आहे.”
छायाचित्र: ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर ब्रेंडन गॅल्विन संवाद सत्राला संबोधित करताना
सिनेमॅटोग्राफर ब्रेंडन यांच्या बिहाइंड एनीमी लाइन्स, वेरोनिका ग्वेरिन आणि फ्लाइट ऑफ द फिनिक्स यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांना, अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी श्रेणीमधील आयरिश चित्रपट आणि दूरचित्रवाणी पुरस्काराचा समावेश आहे.
* * *
PIB Mumbai |N.Meshram/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979960)
Visitor Counter : 101