संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल अकादमी, एझिमाला येथे शरद ऋतुतील सत्र 2023 च्या पासिंग आऊट परेडचे आयोजन

Posted On: 25 NOV 2023 6:37PM by PIB Mumbai

भारतीय नौदल अकादमी, एझिमाला येथे शनिवार, दिनांक 25 नोव्हेंबर 23 रोजी आयोजित, नेत्रदीपक पासिंग आऊट परेडमध्ये भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमाचे 105 प्रशिक्षणार्थी, 38 नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (तटरक्षक), 35 आणि 36 नेव्हल ओरिएंटेशन कोर्सचे कॅडेट यांच्यासह 158 प्रशिक्षणार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार आणि मॉरिशसमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला प्रशिक्षणार्थीसह 5 देशांतील 8 परदेशी कॅडेट्सचा समावेश होता:

प्रमुख पाहुणे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यांनी समारंभपूर्वक निरीक्षण पूर्ण झाल्यावर गुणवंत प्रशिक्षणार्थी आणि कॅडेट्सना पदके प्रदान केली.

प्रशिक्षणार्थी रविकांत रंजन यांना भारतीय नौदल अकादमी बी.टेक अभ्यासक्रमासाठी ‘राष्ट्रपतींचे सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. इतर पदक विजेते पुढीलप्रमाणे :-

(अ)  आयएनएसी बी. टेक. अभ्यासक्रमासाठी सीएनएस  रौप्य पदक - प्रशिक्षणार्थी  सुशेन पुजानी

(आ) आयएनएसी बी. टेक. अभ्यासक्रमासाठी एफओसी-इन-सी साउथ कांस्य पदक -प्रशिक्षणार्थी पीयूष एन थोरवे

(इ) एनओसी (विस्तारित) साठी सीएनएस सुवर्ण पदक - कॅडेट आकाश दहिया

(ई) एनओसी (विस्तारित) साठी एफओसी-इन-सी दक्षिण रौप्य पदक (विस्तारित) – कॅडेट अणावकर श्लोक

(उ) कमांडंट, एनओसी (विस्तारित) साठी आय एन ए  कांस्य पदक - कॅडेट समर्थ राजपूत

(ऊ) महासंचालक तटरक्षक दल सर्वोत्कृष्ट असिस्टंट कमांडंट - सहाय्यक कमांडट हितेश रतन.

***

Madhuri P/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979864)
Read this release in: English , Urdu , Hindi