ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते आणि साध्वी निरंजन ज्योती यांनी आज नवी चेतना अभियानाच्या  दुसऱ्या वर्षाचे केले उद्घाटन

Posted On: 25 NOV 2023 6:34PM by PIB Mumbai

 

ग्रामीण विकास आणि पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज नवी दिल्ली येथे नवी चेतना अभियानाच्या दुसऱ्या वर्षाचे उद्घाटन केले.  ग्रामविकास सचिव शैलेशकुमार सिंह, अतिरिक्त. ग्रामीण उपजीविका सचिव चरणजित सिंग आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. शमिका रवी, राज्य उपजीविका अभियानातील मान्यवर आणि प्रतिनिधी, बँकिंग समुदाय, विकास भागीदार आणि देशभरातील नागरी समाज संस्था आणि बचतगटांचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलस्ते म्हणाले की, 2014 मध्ये हे सरकार सत्तेवर आले तेव्हा केवळ 2.34 कोटी बचत गटांची नोंदणी झाली होती.  आज देशभरात 10 कोटी बचत गट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण घोषित केल्यामुळे प्रत्येक संस्था आणि संघटनेच्या उच्च पदांवर त्या आपल्याला दिसतील.  गेल्या वर्षीपासून लिंग समानता अभियानात लक्षणीय प्रगती केल्याबद्दल मी दीदींचे अभिनंदन करतो आणि आपल्या पंतप्रधानांच्या कल्पनेप्रमाणे ग्रामीण भारताचा कायापालट करण्यासाठी सर्वांगीण चौफेर  विकास सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी त्यांना  प्रोत्साहित करतो.

साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या की, भारताचा इतिहास पाहिला तर प्राचीन काळापासून आपल्या देशात महिलांना नेहमीच सक्षम करण्यात आले होते. त्यातही मध्ये एक काळ असा होता जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून आपल्यावर अत्याचार होत होते .  मात्र देशातील सध्याच्या वातावरणामुळे आपण पुन्हा एकदा तेच सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करत आहोत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे आज महिला त्यांच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक सहाय्य मिळण्यापुरत्या मर्यादित नाहीत , तर त्या घरासाठी देखील समान योगदान देत आहेत. या देशातील सर्व महिला आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सक्षम झाल्या  तरच भारत विकसित राष्ट्र होऊ शकेल.

या कार्यक्रमात विशेष वक्त्या म्हणून सहभागी असलेल्या डॉ शमिका रवी यांनी आपल्या भाषणात, कोणताही मोठा बदल घडवून आणण्यात सर्वात मोठी भूमिका समुदाय कसा पार पडू शकतो हे विशद केले सामुदायिक उपाययोजना, हाच सामाजिक समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. आणि अशा बदलाच्या सर्वात मोठ्या भागीदार महिला आहेत. लैंगिक आधारावर होणाऱ्या हिंसाचाराच्या, घटना आणि प्रश्न समाजाच्या कोणत्याही विशिष्ट स्तरासाठी वेगळे नाहीत. त्यामुळे 'सहेंगे नहीं, कहेंगे और चुप्पी तोडेंगे' ही काळाची गरज आहे, असं सांगून गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणाच्या पुनरुत्थानातील सकारात्मक बदल उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत, दीनदयाल अंत्योदय योजनेच्या, “नई चेतना- पहल बदलाव कीया पथदर्शी वार्षिक मोहिमेचे दुसरे वर्ष पूर्ण झाले आहे. ही स्त्री-पुरुष भेदभाव नष्ट करणे आणि लैंगिक आधारावर होणाऱ्या हिंसाचारचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवली जात असलेली मोहीम आहे. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधत, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. होते. हिंसाचाराला एक प्रकारची मान्यता देणे, त्याविरुद्ध बोलण्याची अनिच्छा/उदासिनतात्याचे समर्थनयंत्रणांबद्दल जागरूकता नसणे आणि सुरक्षित जागा नसणे यासारख्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे हा या मोहिमेचा प्रमुख हेतू आहे.

या मोहिमेत विविध क्षेत्रातील हितसंबंधी घटक, ज्यात राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, समुदाय संस्था, पंचायत राज संस्था, समुदाय सदस्य, DAY-NRLM चे घटक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित प्रमुख मंत्रालये आणि विभागांचा समावेश आहे.

13 मंत्रालये/विभागांनी एकत्रित येत एक महिन्याच्या कालावधीसाठी ही मोहीम सुरू केली  आहे. या मोहिमेद्वारे समाजातील सर्व घटकांना संवेदनशील बनवण्यासाठी समुदाय स्तरावर जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले जातील. यामध्ये रांगोळी काढणे, लिंग-आधारित हिंसा निर्मूलनाची प्रतिज्ञा, ग्रामसभा स्तरावरील बैठका, निबंध आणि चित्रकला स्पर्धा इत्यादींचा समावेश असेल. याशिवाय, पंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना लिंग-आधारित हिंसाचार आणि महिलांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासंबंधी कायद्यांबाबत संवेदनशील बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मोहिमेच्या कालावधीत, तालुका आणि जिल्हा स्तरावर लैंगिक मंचांच्या बैठका आयोजित केल्या जातील, पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी, शाळा इत्यादींसारख्या इतर कार्यकर्त्याचे अशा मुद्यांच्या संवेदनशीलते विषयी प्रबोधन केले जाईल.

या मोहिमेला सहेंगे नहींकहेंगेऔर चुप्पी तोडेंगेअशी यथोचित टॅगलाइन देण्यात आली आहे.

***

G.Chippalkatti/S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979802) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi