विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयोनोस्फियर मधील भूकंपाच्या उगमाच्या शोधाची प्रक्रिया उलगडली तर ती अवकाशाधारित निरीक्षणांचा वापर करून भूकंपाची कारणे समजून घेण्याचा मार्ग खुला करेल
Posted On:
24 NOV 2023 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
एका नव्या अभ्यासातून हाती आलेल्या माहितीनुसार, भूकंपाची प्रक्रिया, मग ती तुलनेने अत्यंत लहान का असेना, आयोनोस्फियरमध्ये प्रभाव टाकत असतात कारण ते भू-चुंबकत्व आणि लाईन ऑफ साईट भूमिती यांसारख्या घटकांसह भूकंपाचा आवाका आणि कोसेस्मिक आयोनोस्फियरीक परटरबेशन्स (सीआयपी) चा काळ यावर प्रभाव टाकतात. या अभ्यासाचे निष्कर्ष अवकाशातून भूकंपाच्या उगमाच्या प्रक्रियेचे निरीक्षन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि त्यातून अवकाशाधारित निरीक्षणांचा वापर करून भूकंपाची कारणे समजून घेण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
भूकंपाच्या वेळी भूस्तरांच्या उभ्या दिशेने होणाऱ्या हालचालींमुळे वातावरणातील ध्वनिक लहरींना (एडब्ल्यू) चालना मिळते. या लहरी वरच्या दिशेने पसरत जातात, आयोनोस्फियर पर्यंत पोचतात आणि तेथील दृष्टी-पथाच्या लगतच्या जागतिक दिशादर्शन उपग्रह यंत्रणेतील (जीएनएसएस) स्वीकारक आणि उपग्रह यांना जोडणाऱ्या अनेक अणुंमध्ये व्यत्यय निर्माण करतात. या व्यत्ययालाच कोसेस्मिक आयोनोस्फियरीक परटरबेशन्स (सीआयपी) असे म्हणतात.असे जवळच्या क्षेत्रातील सीआयपी सहसा स्त्रोताच्या 500 ते 600 किलोमीटरच्या कक्षेत होतात. भूतकाळात झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे गृहीत धरण्यात आले होते की,थेट एडब्ल्यूज साठी सर्वात मोठ्या उभ्या विस्थापनासाठी बिंदू स्त्रोत कारणीभूत असतात आणि भूपृष्ठापासून एकल ध्वनिक ठोका गृहीत धरुन अशा जवळच्या क्षेत्रातील सीआयपीचे नमुने तयार करण्यात आले होते. मात्र, मोठ्या भूकंपामध्ये शेकडो किलोमीटरच्या क्षेत्रावर अनेकानेक भेगांसह भूपृष्ठ फाटून जाते; अशा वेळी एकल स्त्रोताचे गृहीतक अयोग्य ठरते.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय भू-चुंबकीय संस्थेतील शास्त्रज्ञांनी तुलनेने कमी गंभीर भूकंपांच्या (8 एमडब्ल्यू पेक्षा कमी क्षमतेचे) संदर्भात हे गृहीतक तपासण्याचा प्रयत्न करताना, 2023 मध्ये तुर्कस्तानला झालेल्या भूकंपाच्या वेळी जवळच्या क्षेत्रातील सीआयपीचे विश्लेषण केले. त्यातून पहिल्यांदाच त्यांनी हे दाखवून दिले की, तुलनेने लहान भूकंपाच्या वेळी निर्माण झालेल्या आयोनोस्फियरीक परटरबेशन्समध्ये देखील भूपृष्ठावर पडलेल्या भेगांसह बहुविध स्त्रोतांच्या योगदानाचा समावेश असू शकतो. तुर्कस्तान-सिरीया सीमेजवळ, दक्षिण तुर्कस्थानमध्ये दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी 7.8 एमडब्ल्यू क्षमतेचा मोठा विनाशकारी भूकंप (ईक्यू1) झाला. हा भूकंप भूतलावर नोंदल्या गेलेल्या सर्वात मोठ्या स्ट्राईक-स्लीप प्रकारच्या भूकंपांपैकी एक मानला जातो. या भूकंपाच्या 9 तासांनंतर, पहिल्या भूकंपाच्या उत्तरेला दुसरा भूकंप झाला (ईक्यू2). ईक्यू1 आणि ईक्यू2यामध्ये निर्माण झालेल्या सीआयपीचा अभ्यास करून भूभौतिक संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात आलेल्या अभ्यास अहवालातून प्रथमच असे दिसून आले की वेगवेगळ्या वेळी थांबून थांबून, विविध स्त्रोतांकडून आलेल्या उप-सीआयपीजच्या संयोजनामुळे वेगवेगळ्या उपग्रहांच्या जोड्यांसाठी हा सीआयपी वैविध्यपूर्ण विस्तार आणि कालावधी दर्शवतो.
शास्त्रज्ञांनी असे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे की बहुविध स्त्रोतांकडून येणाऱ्या ध्वनिक लहरी (एडब्ल्यूज) केंद्रबिंदूपासून वेगवेगळ्या दिगांशावर असलेल्या जागतिक दिशादर्शन उपग्रह यंत्रणेच्या (जीएनएसएस) स्थानकांमध्ये नोंदल्या गेलेल्या परटरबेशन्सच्या व्याप्तीत आणि कालावधीत फरक दिसून येतो.
ईक्यू2चे सीआयपी ईक्यू2 पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणातील आणि किंचित कमी कालावधीचे आहेत हे दाखवून देत शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की एकल स्त्रोत आणि उच्च पार्श्वभूमीच्या आयोनोस्फेरिक अणूंच्या घनतेमुळे हा फरक दिसून येत आहे.
दोन्ही भूकंपांच्या केंद्र्बिंदुंची स्थळे आणि त्यांच्यामुळे पडलेल्या निश्चित भेगांचे नमुने
आकृती क्र.1 : दक्षिण तुर्कस्थानमध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्वेकडील अॅनाटोलियन भेग पडली आणि त्यातून 7.8 एमडब्ल्यू क्षमतेचा भूकंप (ईक्यू1) झाला. हा भूकंप भूतलावर नोंदल्या गेलेल्या सर्वात मोठ्या स्ट्राईक-स्लीप प्रकारच्या भूकंपांपैकी एक आहे. 9 तासांनंतर ईक्यू1 च्या उत्तरेला 7.7 एमडब्ल्यू क्षमतेचा दुसरा भूकंप झाला (ईक्यू2) (अ) नकाशात ईएएफ,उत्तर अॅनाटोलियन भेग तसेच ईक्यू1 आणि ईक्यू2चे केंद्रबिंदू दिसत आहेत. दोन्ही भूकंपांमुळे एस1,एस2 आणि एस3 हे तीन विभाग तुटले. (ब) अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणातून (2023)मिळालेले भेगांचे निश्चित नमुने
(ए)ईक्यू1 आणि (क)ईक्यू2 साठी निको-ई09 आणि निको-ई02 जोड्यांसाठी सिंथेटिक कोसेस्मिक आयोनोस्फियर परटरबेशन्स (सीआयपी) ज्यांची तुलना निरीक्षित स्लान्ट टीईसी (एसटीईसी) टाईम सिरीजशी केली आहे. ईक्यू1 साठी संपूर्ण भेग तीन वेगवेगळ्या ध्वनिक लहरींकडून(एडब्ल्यूज)- एडब्ल्यू-1, एडब्ल्यू-2 आणि एडब्ल्यू-3 कडून तयार झाली आहे ज्याची स्थिती पॅनेल(ब) मध्ये दर्शवली आहे. सिंथेसाइज्ड व्यत्ययांचा आकार आपल्याला स्वतंत्र उप-सीआयपीजपेक्षा एकूण सीआयपीच्या दीर्घ कालावधीचे स्पष्टीकरण देतो. ई09 चा आयोनोस्फियर पीयर्स पॉइंट ट्रॅक(ए) प्रमाणेच 0.5 – 2.0 युटीच्या कालमर्यादेसाठी आहे.ईक्यू2साठी, त्याच्या एका उच्चांकी रिलीज चा विचार करून (आकृती 1अ) आपण पहिल्या भेगेनंतर 10 सेकंदांनी फुटलेल्या केवळ एका स्त्रोताला (ड) गृहीत धरले आहे.
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979643)
Visitor Counter : 100