ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
जागतिक साखर क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी 2024 साठी भारताकडे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद
जगाच्या तुलनेत भारतामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक उसाची किंमत
जागतिक स्तरावर साखरेच्या विक्रमी किमती असूनही, भारतातील जनतेसाठी सर्वात स्वस्त दर
Posted On:
24 NOV 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने 63 व्या बैठकीत 2024 साठी संघटनेच्या अध्यक्षपदी भारताचे नाव घोषित केले आहे. जागतिक स्तरावर साखर क्षेत्राचे नेतृत्व करण्याची देशासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे आणि या क्षेत्रातील देशाच्या वाढत्या सन्मानाचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या परिषदेच्या बैठकीला उपस्थित संजीव चोप्रा केंद्रीय सचिव (अन्न) म्हणले की 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत सर्व सदस्य देशांकडून पाठिंबा आणि सहकार्याची अपेक्षा करत आहे आणि सर्व सदस्य देशांना ऊस लागवड, साखर आणि इथेनॉल उत्पादन आणि उप-उत्पादनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी अधिक शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यासाठी एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर भारताचा भर आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा उपभोक्ता आणि साखरेचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जागतिक स्तरावरील साखरेच्या खपामध्ये सुमारे 15% वाटा आणि साखरेच्या उत्पादनात सुमारे 20% वाटा असलेला भारतीय साखर उद्योगाचा कल जागतिक बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडतो.
भारत हा आपल्या शेतकर्यांना उसाची सर्वाधिक किंमत देणारा आणि नफा कमावण्यासाठी पुरेसा सक्षम आहे हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. भारताने केवळ शेतकरी आणि उद्योगांची काळजी न घेता ग्राहकांना प्राधान्य देऊन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. देशांतर्गत साखरेच्या किरकोळ किमती सातत्यपूर्ण आणि स्थिर आहेत. जागतिकस्तरावरील किमतीत एका वर्षात 40% ने वाढ होत असताना, भारताने उद्योगावर अतिरिक्त भार न टाकता गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या किंमतीतील वाढ 5% च्या आत राखण्यात यश मिळवले आहे.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979621)
Visitor Counter : 235