पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलाद क्षेत्रातील उत्पादनांचे लेबलिंग आणि ब्रँडीग सुरु करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पहिल्या उपक्रमावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक

Posted On: 23 NOV 2023 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

‘मेड इन इंडिया’ म्हणजेच स्वदेश  निर्मित पोलाद उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी त्यांचे लेबलिंग आणि ब्रँडीग करण्याची पद्धत सुरु करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पोलाद तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रथमच अभिनव प्रकारचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. खरेदीदारांसमोर भारतीय पोलाद उत्पादने अधिक आकर्षक स्वरुपात सादर करण्यासह या उपक्रमातून वस्तूंच्या दर्जाच्या प्रमाणीकरणाची   देखील सुनिश्चिती होणार आहे.

केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत केंद्रीय पोलाद, ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाचे राज्यमंत्री फागन सिंह कुलस्ते, संसद सदस्य जनार्दन सिंग सिगरीवाल आणि अखिलेश प्रसाद सिंग यांच्यासह केंद्रीय पोलाद मंत्रालय आणि मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संसद सदस्यांसमोर केलेल्या औपचारिक सादरीकरणाने या बैठकीची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आणि पंतप्रधानांनी मांडलेली ‘मेक इन इंडिया’ ब्रँडची संकल्पना वास्तवात साकार करण्यात ब्रँडीगला असलेले महत्त्व अधोरेखित केले. जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची उभारणी करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांवर देखील त्यांनी अधिक भर दिला. यासाठी भारतीय पोलादाची गुणवत्ता, नवोन्मेष आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठीच्या पद्धतींचे दर्शन घडवणारी एकात्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख भारतीय पोलादाला मिळवून देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय पोलाद मंत्रालयाने केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलाद उद्योग, केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) तसेच भारतीय गुणवत्ता मंडळ (क्यूसीआय) या महत्त्वाच्या भागधारकांना सोबत घेऊन सप्टेंबर2022 मध्ये भारतीय पोलाद उत्पादनांच्या ब्रँडीगसाठी निश्चित दिशेने सहयोगी प्रयत्न करणारे उपक्रम सुरु केले आहेत. मेड इन इंडिया ब्रँडीगमुळे देशात निर्मित पोलाद उत्पादनांवर उत्पादनाचे नाव, मेड इन इंडिया बोधचिन्ह आणि क्यूआर कोड यांचे तपशील असलेले लेबल्स लावणे शक्य होईल.

विविक्षित क्षेत्रातील उत्पादनांचे लेबलिंग आणि ब्रँडीग सुरु करण्यासाठी एखाद्या मंत्रालयाने अशा प्रकारचा उपक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ आहे याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.

उत्पादनांच्या सर्व श्रेणींसाठी सर्व आयएसपी (आयआयएससीओ ) पोलाद कारखाना आणि भारताच्या 65 टक्के पोलाद उत्पादनांना यात सहभागी करून घेतले असून या सर्व उत्पादनांवर सामायिक लेबल्स लावण्यात येणार आहेत.

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979241) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi