मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

अहमदाबाद येथे भारत वैश्विक मत्स्य व्यवसाय परिषद 2023 संपन्न


मत्स्यव्यवसामध्‍ये तंत्रज्ञानातील नवकल्पनांच्या माध्‍यमातून स्टार्ट-अप आणि उद्योजकीय परिसंस्था यांना चालना देण्याची आवश्‍यकता परिषदेत व्यक्त

Posted On: 23 NOV 2023 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील स्टार्ट-अप आणि उद्योजकीय परिसंस्थेला चालना देण्यासाठी  तांत्रिक नवकल्पनांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर  करण्याचे  आवाहन ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023’  च्या  समारोपप्रसंगी करण्‍यात आले.

अहमदाबाद येथे बुधवारी ही परिषद संपन्‍न झाली. यावेळी  पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री  परशोत्तम रुपाला यांनी परिषदेत सहभाग घेतल्याबद्दल मच्छीमार समुदाय आणि इतर प्रतिनिधींचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री  परशोत्तम रुपाला म्हणाले की, भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने  अशा प्रकारची परिषद  प्रथमच आयोजित केली आहे. विदेशी शिष्टमंडळे, आंतरराष्ट्रीय संस्था, उद्योजक आणि इतर भागधारकांना एकत्र आणून जागतिक मत्स्यपालन परिषदेचे विभागाने  आयोजन केले.

दोन दिवसीय   या परिषदेत 14,000 हून अधिक प्रतिनिधींनी  प्रत्यक्ष  आणि आभासी माध्‍यमातून सहभाग नोंदवला. या परिषदेत विविध मान्यवर आणि भागधारकांचा समावेश होता.  परिषदेत  विविध राष्ट्रांचे मत्स्यपालन मंत्री, राजदूत आणि विविध राष्ट्रांचे  शिष्टमंडळ, जागतिक मत्स्य शास्त्रज्ञ, धोरण निर्मातेमत्स्य व्यवसाय समित्यांचे प्रतिनिधी आणि आणि गुंतवणूकदार  बँकर्स यांचा समावेश होता.

‘इंडस्ट्री कनेक्ट’  या  सत्रांमध्‍ये   उद्योगातील  धुरीण, धोरणकर्ते, उद्योजक आणि तज्ञांना एकत्र आणले, या क्षेत्रासमोरील गंभीर आव्हाने आणि संधी याबाबत चर्चा झाली. उद्योगात शाश्वत वाढ घडवून आणण्यासाठी नवकल्पना, तंत्रज्ञानाचा अवलंब, लैंगिक संवेदनशीलता आणि सहयोगी उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी प्रतिपादन केले.

'मत्स्यव्यवसाय आणि जलचर संस्‍कृती वाढीसाठी   स्टार्ट-अप्सची भूमिका' या सत्रातील वक्त्यांनी वापरण्यास सुलभ आणि किफायतशीर उत्पादने आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. तंत्रज्ञानाचा   प्रत्यक्षात अंवलंबासाठी जास्‍त काळ लागणे, गुंतवणुकीचा अभाव, अपुरे विपणन आणि तांत्रिक सहाय्य या उद्योगातील काही अडचणी आहेत.  मत्स्यव्यवसाय क्षेत्रात मासेमारीनंतरच्या  क्रियाकलापांमध्ये महिलांचे भरीव योगदान आहे. मात्र त्यांना मोबदला कमी दिला जातो, असे नमूद केले.

"मत्स्यपालन मूल्य साखळीमध्‍ये  महिलांचा सहभाग" या विषयावर चर्चा झाली. या क्षेत्रामध्‍ये कार्यरत असलेल्या  महिलांपुढे अनेक   आव्हाने आहेत.   सामाजिक चौकटी, लैंगिक संवेदनशीलतेचा अभाव आणि कमी जागरूकताही या क्षेत्रातील महिलांसमोरील काही आव्हाने आहेत.

'कोल्ड चेन इन फिशरीज पोस्ट-हार्वेस्ट मॅनेजमेंट' या विषयावरील सत्रात शीत साखळीच्या  महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. मासेमारीनंतर  नुकसान कमी करण्यासाठी साखळी व्यवस्थापन आणि मत्स्य उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी काम केले तर संपूर्ण मत्स्य पुरवठा साखळी सुरळीत राहू शकणार आहे, असा विचार यावेळी मांडण्‍यात आला.

 

S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979192) Visitor Counter : 119