कोळसा मंत्रालय

अवजड यंत्रांच्या देशांतर्गत उत्पादनाबाबतच्या उच्चस्तरीय समितीने कोळसा मंत्रालयाला सादर केला अहवाल


खनिकर्म उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनावर विशेष भर दिला जाणार

येत्या सहा वर्षांमध्ये उपकरणांची आयात बंद करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडने आखली धोरणात्मक योजना

Posted On: 23 NOV 2023 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या दृढ वचनबद्धतेच्या अनुषंगाने, कोळसा मंत्रालय, कोळसा खाण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. हे प्रयत्न "मेक इन इंडिया" अभियानाला चालना देणार्‍या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टाच्या मुलभूत तत्त्वांशी जोडले गेले आहेत.

या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी, हेवी अर्थ मूव्हिंग मशिनरी आणि भूमिगत खाण उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याबाबत शिफारशी करण्यासाठी सीआयएल च्या संचालकांच्या (तांत्रिक) अध्यक्षतेखाली एक आंतरशाखीय उच्च-स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये जमिनीखाली खोलवर खाणकाम करणारी, दर्जेदार आणि कमी-क्षमतेची आणि त्याच्याशी संबंधित सहायक उपकरणांचा समावेश आहे.

2030 नंतरही कोळसा हा प्रमुख ऊर्जा स्त्रोत राहील, असा अंदाज आहे. म्हणून खुल्या खाणी आणि जमिनीखालील खाणींसाठी देशात पुढील 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपकरणांची गरज भासेल, अशी या समितीला अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांनी आपला अंतिम अहवाल सादर केला आहे.  

या समितीमध्ये अवजड उद्योग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, एसीसीएल, एनएलसीआयएल, एनटीपीसी, डब्ल्यूबीपीडीसीएल, बीईएमएल, कॅटरपिलर, टाटा हिताची, जीएआयएनडब्ल्यूईएलएल, या कंपन्या आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध भागधारकांचा  समावेश होता.

सध्या, कोल इंडिया लिमिटेड (CIL) उच्च क्षमतेची उपकरणे आयात करते. यामध्ये इलेक्ट्रिक रोप फावडे, हायड्रॉलिक फावडे, डंपर, क्रॉलर डोझर, ड्रिल, मोटर ग्रेडर आणि फ्रंट-एंड लोडर व्हील डोझर या उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांचे मूल्य 3500 कोटी रुपये इतके आहे, तर त्यावरील सीमाशुल्का पोटी रु. 1000 कोटी अतिरिक्त खर्च येतो. या आयातीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी, सीआयएलने पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने आयात कमी करण्यासाठी धोरणात्मक योजना आखली आहे.

देशांतर्गत उत्पादन केलेल्या उपकरणांना प्रोत्साहन देणे आणि विकसित करणे, हे या दृष्टिकोनाचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत उत्पादकांकडून यापूर्वीच उच्च क्षमतेच्या यंत्र सामुग्रीची  खरेदी केली जात आहे.

उपकरणांच्या मानकीकारणाबाबत सीआयएलच्या सध्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने समितीने खुले/व्यावसायिक खाणकाम कंत्राटदार, MDO/आउटसोर्सिंग कंत्राटदार निवडणे आणि विभागीय उपकरणांना देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी उपकरणांचे मानकीकरण करण्याची शिफारस केली आहे.

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979100) Visitor Counter : 70


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil