माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जसा समाज समृद्ध होईल तशी असमानता कमी झाली पाहिजे: दिग्दर्शक अँटोनियो फरेरा
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2023
समाज जसजसा समृद्ध होत जाईल तसतशी असमानता कमी व्हायला हवी, पण तसे होताना दिसत नाही, असे पोर्तुगीज चित्रपट बेला अमेरिकाचे दिग्दर्शक अँटोनियो फरेरा यांनी सांगितले. काल महोत्सवामध्ये सिनेमा ऑफ द वर्ल्ड श्रेणी अंतर्गत त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांनी आज इफ्फी मध्ये प्रसारमाध्यम, प्रतिनिधी आणि सिने रसिकांशी संवाद साधला.

चित्रपटाच्या माध्यमातून असमानता कमी करण्याचा मुख्य संदेश देण्यासाठी बेला अमेरिका हा चित्रपट अन्न, लोकानुनय आणि विनोदाच्या संकल्पनेवर आधारित आहे, असे अँटोनियो फरेरा यांनी सांगितले. मानवी सन्मान सर्वोपरि आहे अशा जगात, समतावादी समाजाच्या दिशेने आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणणाऱ्या सर्वव्यापी सामाजिक असमानता दूर करणे अत्यावश्यक आहेअसे मत दिग्दर्शक अँटोनियो यांनी व्यक्त केले.
या चित्रपटाद्वारे, दिग्दर्शकाने सामूहिक जाणीवेला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो, जिथे समानता ही केवळ आकांक्षा नसून एक जिवंत वास्तव आहे तसे जग निर्माण करण्यासाठी आवश्यक ती दरी भरून काढण्याचे आवाहन सगळ्यांना करतो.
सखोल सामाजिक संदेश देण्यासाठी विनोदी ढंगाचा वापर करण्याबद्दल बोलताना , दिग्दर्शकांनी सांगितले की, विनोद हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो त्यांच्या चित्रपटात प्रतिबिंबित होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात, प्रेक्षकांना गंभीर आणि उपदेशात्मक संदेश देण्याऐवजी विनोदी आशय वापरणे सोपे वाटते, असे मत फरेरा यांनी व्यक्त केले.

चित्रपटाचा सारांश: बेला अमेरिका हा अँटोनियो फरेरा दिग्दर्शित पोर्तुगीज चित्रपट आहे. लुकास हा लिस्बन इथल्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा प्रतिभाशाली स्वयंपाकी, एक सुंदर आणि यशस्वी व्यक्तिमत्व असलेल्या टेलिव्हिजन कलाकार अमेरिका हिच्या प्रेमात पडतो. तो तिच्या दारात ओळख न दाखवता जेवण ठेवू लागतो, तिची उत्सुकता वाढवतो आणि तिला त्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. अशा प्रकारे त्यांच्यात कोणाच्याही नकळत हळुवारपणे प्रेम बहरत जाते मात्र अमेरिका ही अध्यक्षीय निवडणुक लढवत असल्यामुळे हे संबंध उघड झाले तर तिची राजकीय महत्वकांक्षा धोक्यात येवू शकते, हे नाट्य या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

कलाकार आणि पडद्यामागील कलाकार :
दिग्दर्शक: अँटोनियो फरेरा
कलाकार: एस्टेवाओ अँट्युनेस, साओ जोस कोरेया, कस्टोडिया गॅलेगो, जोआओ कॅस्ट्रो गोम्स, डॅनिएला क्लारो, कार्लोस एरिया
पटकथा लेखक: सीझर डॉस सॅंटोस सिल्वा आणि अँटोनियो फरेरा.
छायांकन: पाउलो कॅस्टिल्हो.
संकलक : अँटोनियो फरेरा
प्रसारमाध्यमांशी साधलेला संपूर्ण संवाद येथे पहा:
* * *
PIB Mumbai |Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1979029)
Visitor Counter : 123