माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रेक्षकांना जास्तीतजास्त वास्तववादी वाटेल अशी कथा सांगणे ही सिनेमा मागची संकल्पना आहे: अभिनेता के. के. मेनन


आशा, धैर्य आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताच्या इतिहासातील सत्य घटनेची कथा सांगणे ही ‘द रेल्वे मेन’ बनवण्यामागची मुख्य कल्पना होती: दिग्दर्शक शिव रवैल

भारतीय चित्रपटसृष्टीत तीस वर्षांहून अधिक काळ काम करूनही लक्षवेधी चित्रपटांमध्ये काम करण्याची उत्साहाची भावना आपल्यामध्ये आजही जागृत आहे असे समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले लोकप्रिय अभिनेते के के मेनन यांनी आज गोव्यामध्ये आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इन-कन्व्हर्सेशन’, अर्थात संवाद सत्रात सांगितले.  

‘द रेल्वे मेन’ या मालिकेतील स्टेशन मास्तरच्या व्यक्तिरेखेचा प्रामाणिकपणा, माझ्यासाठी एका विशिष्ट भूमिकेच्या अवकाशाची खोली आणि उंची आजमावण्याचा अद्भुत अनुभव देणारा ठरला आहे असे  के. के. मेनन यांनी सांगितले .  

एका वास्तविक घटनेवर आधारित चार भागांची मालिका बनवण्या मागचे कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक शिव रवैल म्हणाले की, एक चित्रपट निर्माता म्हणून, प्रेक्षकांना सर्वात कठीण कथा सांगण्यासाठी स्वतःला तयार करणे, हा सिनेमा बनवण्यामधील सर्वोत्तम भाग असल्याचे आपण समजतो.

नेटफ्लिक्स इंडियाच्या मालिका प्रमुख तान्या बामी म्हणाल्या, ‘एखाद्या ट्रेंडला आकार देणारी आणि प्रेक्षकांना वास्तववादी कथा सांगणारी आशयसंपन्न सामग्री तयार करणे, ही आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त दर्शकसंख्या मिळविण्याची गुरुकिल्ली आहे.’

‘द रेल्वे मेन’ मालिकेचे कलाकार आणि क्रू सदस्य

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), एनएफडीसी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) आणि ईएसजी यांनी एकत्रितपणे इफ्फी महोत्सवात मास्टरक्लास आणि इन-कॉन्व्हर्सेशन सत्रांचे आयोजन केले आहे. विद्यार्थी आणि सिने रसिकांमध्ये चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूबाबत उत्कंठा जागवण्यासाठी इफ्फी महोत्सवात या वर्षी 20 पेक्षा जास्त मास्टरक्लास आणि इन-कॉन्व्हर्सेशन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

*****

Jaydevi PS/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1979004) आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी