जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत आयोजित 8 व्या भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (आयडब्ल्यूआयएस ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 22 NOV 2023 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023

नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे आयोजित  8 व्या भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (आयडब्ल्यूआयएस ) उद्‌घाटन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज - 22 नोव्हेंबर 2023 रोजी  झाले.  राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी ) आणि गंगा नदी खोरे व्यवस्थापन आणि अभ्यास केंद्राच्या  (cGanga) माध्यमातून आयोजित ही शिखर परिषद  24 नोव्हेंबरपर्यंत  चालणार आहे.

'जमीन, पाणी आणि नद्यांसह विकास' ही आयडब्ल्यूआयएस 2023 ची संकल्पना असून भारताच्या जल क्षेत्रातील गतिशील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि संधींसाठी   वैज्ञानिक तज्ञ, हितसंबंधीत  आणि सरकारी प्रतिनिधींना एकत्रित आणण्याचा यामागचा उद्देश आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांचे  समाजाच्या तीन प्रमुख स्तंभांवर प्रकाश टाकणारे भाषण यावेळी झाले.   नीतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण आणि अर्थशास्त्र यांची शाश्वत भविष्य घडवण्यातील  अविभाज्य भूमिका मंत्री गडकरी यांनी  अधोरेखित केली.

या शिखर परिषदेच्या  पहिल्या  दिवशी 'समर्थ गंगा आणि उत्पादक जमीन- I' आणि "नद्यांची जीवन शैली आणि अर्थशास्त्र-I या विषयावर सत्रे आयोजित करण्यात आली होती.

त्याचवेळी, सिटीजच्या  (CITIS )पहिल्या दिवशी, तंत्रज्ञानाचे पैलू   मूल्यांकन पॅनेलसमोर सादर केल्या करण्यात आले आणि प्रदर्शनाचे  उद्घाटन केल्यानंतर ते पाहण्यासाठी खुले करण्यात आले.  उल्लेखनीय म्हणजे, यात जलज स्टॉल एक मध्यवर्ती आकर्षण होते नाविन्यपूर्ण पाणी उपाय शोधण्यासाठी उत्सुक असलेल्या उपस्थितांचे या स्टॉलने लक्ष वेधून घेतले.  आयडब्ल्यूआयएस  आणि सिटीजच्या  (CITIS ) पार्श्वभूमीवर , भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात पाणी, ऊर्जा, कचरा, अन्न, शेती आणि वाहतूक यासह विविध क्षेत्रांमध्ये  उच्च-प्रभाव पाडणारे  नाविन्यपूर्ण उपाय दाखवण्यात आले.

S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1978958) Visitor Counter : 101


Read this release in: English , Urdu , Hindi