आयुष मंत्रालय
‘अग्नी - आयुर्वेद ज्ञान नैपुण्य उपक्रम’- आयुष मंत्रालयाच्या सीसीआरएएसचा उपक्रम
Posted On:
22 NOV 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023
आयुष मंत्रालया अंतर्गत असलेल्या केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस), आपल्या नवीन प्रयत्नाचा एक भाग म्हणून , वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि पुराव्यावर आधारित मूल्यांकनाद्वारे व्यावहारिक आयुर्वेद पद्धतींना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. भारतीय औषधोपचार पद्धतीमध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांसाठी "आयुर्वेद ज्ञान नैपुण्य उपक्रम" सुरू केला आहे.
आयुर्वेदातील संशोधन कार्याची नोंद करण्यामध्ये स्वारस्य असलेले पात्र आयुर्वेद अभ्यासक सीसीआरएएस संकेतस्थळावर http://ccras.nic.in (http://ccras.nic.in/sites/default/files/Notices/CCRAS-AGNI.pdf) आपल्याकडील उपलब्ध असलेले संशोधन कार्य दस्तऐवज स्वरूपात 15 डिसेंबर 2023 पर्यंत स्वारस्य पत्र पाठवू शकतात. यासाठी ccrasagni [at]gmail[dot]com असा इमेल आयडी देण्यात आला आहे. प्रामुख्याने भारतात कार्यरत असणारे 500,000 हून अधिक नोंदणीकृत आयुर्वेद चिकित्सक आहेत.
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी सीसीआरएएस ही एक सर्वोच्च संशोधन संस्था असून आयुर्वेदातील वैज्ञानिक धर्तीवर संशोधन हाती घेण्यासाठी समन्वय, सूत्रीकरण, विकास आणि प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.
अलिकडच्या काळात, आयुर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालयांद्वारे वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी, सीसीआरएएसने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन केंद्र (SPARK), पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद संशोधन प्रशिक्षण योजना (PG-STAR) आणि आयुर्वेद संशोधनाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांसाठी (SMART) कार्यक्रम हे कार्यक्रम सुरु केले आहेत.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978882)
Visitor Counter : 174