माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: कथाकथनाला नव्याने परिभाषित करण्याचे वचन देणाऱ्या चित्ताकर्षक चित्रपट विषयक प्रवासासाठी सज्ज व्हा
54व्या इफ्फीमध्ये उद्या इंडियन पॅनोरमा चित्रपटांच्या सादरीकरणाची होणार सुरुवात; 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट सादर होणार
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2023
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात सादर होणारे 25 फीचर आणि 20 नॉन-फीचर चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट विषयक अनुभव देणार आहेत. ‘आत्तम’ या मल्याळी चित्रपटाच्या प्रदर्शनासह उद्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार आहे. विविधतेतील एकता आणि समावेशकता यांच्या सर्वत्र व्यापणाऱ्या संकल्पनांवर बेतलेले आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील संस्कृती, दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्वे आणि कथा यांच्या विस्तृत श्रेणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट विभागात सादर होणारा आणि आनंद एकरसाही यांनी दिग्दर्शित केलेला हा उद्घाटनपर चित्रपट, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याची संधी मिळालेली एक स्त्री आणि बारा पुरुष यांच्या जीवनावर बेतलेला आहे.
‘अँड्रो ड्रीम्स’ हा मीना लोंगीयाम दिग्दर्शित चित्रपट, नॉन-फिचर विभागात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. मणिपुरमधील ग्रामीण भागातील एका गावात चित्रित करण्यात आलेला हा माहितीपट म्हणजे लैबी ही वृध्द स्त्री आणि तीन दशकांपासून सुरु असलेल्या केवळ मुलींसाठीच्या तिच्या फुटबॉल क्लबची कहाणी आहे. हा माहितीपट आर्थिक आव्हाने, ईशान्य भारतातील प्राचीन गावातली पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था आणि रुढीवाद यांच्याशी सुरु असलेल्या या क्लबच्या लढ्याचे दर्शन घडवतो.
अँड्रो ड्रीम्स
इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांतून चित्रपट रसिकांना अत्यंत आनंददायी अनुभव मिळणार असून त्यातून भारतीय चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन शैली आणि सांस्कृतिक समृद्धी यांच्या जगात त्यांना उत्सुकतेने विहार करता येईल.
चित्रपट कलेच्या मदतीने भारताची समृध्द संस्कृती आणि वारसा यांच्यासह भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 1978 मध्ये इफ्फीच्या छत्राखाली भारतीय चित्रपट विभागाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच, भारतीय चित्रपट विभाग वर्षभरातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन करण्याप्रती समर्पित राहिला आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978385)
Visitor Counter : 116