संरक्षण मंत्रालय

नवी दिल्लीत 'आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता राखणे' या विषयावर युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच 2023 चे आयोजन

Posted On: 20 NOV 2023 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023

राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी घडामोडींवरील संशोधन आणि चर्चेसाठी 1870 मध्ये  स्थापन करण्यात आलेली युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (यूएसआय) ही देशातील सर्वात जुनी तज्ज्ञ गटाचा समावेश असलेली संस्था आहे. या संस्थेने 21-22 नोव्हेंबर 2023 रोजी  नवी दिल्ली येथे वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच  2023 चे आयोजन केले आहे.  आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती आणि  संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमा  केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता राखणे’ या विषयावरील मंचाचे आयोजन करण्यात आले आहे

सद्यकालीन संयुक्त राष्ट्र  शांतता मोहिमा   अपारंपरिक शस्त्रे आणि डावपेचांचा वापर होत असलेल्या म्हणजेच  वाढत्या  भिन्न लष्करी  सामर्थ्याच्या अस्थिर वातावरणात   तैनात केल्या जात आहे, या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा (आयएचएल ) तत्त्वांचे पालन सुनिश्चित करणे महत्वाचे झाले आहे. मात्र आधुनिक संघर्षांतील जटिलता , आंतरराष्ट्रीय राजकारणात असणारे मात्र सार्वभौमत्व नसणाऱ्या अराज्य घटकांची कृती  आणि शहरी युद्धक्षेत्रातील लढवय्ये  आणि नागरिक यांच्यातील अस्पष्ट रेषा ही आयएचएल मापदंड  लागू करताना उद्भवणारी आव्हाने आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, संवादात्मक, बहु-हितसंबंधीय  दृष्टिकोनाद्वारे संयुक्त राष्ट्र  शांतता मोहिमांमध्ये आयएचएल आराखड्याची  अंमलबजावणी करण्याच्या  व्यवहार्यता आणि मर्यादांवर चर्चा करणे हे या मंचाचे उद्दिष्ट आहे.  यावेळी आयोजित सत्रांच्या माध्यमातून  नागरिकांचे संरक्षण, शांती सैनिकांविरुद्धच्या  केलेल्या गुन्ह्यांसाठी जबाबदारी, शांतता मोहिमांमध्ये   महिलांची भूमिका आणि अधिक प्रभावी मोहिमांसाठी  तंत्रज्ञानाचा लाभ घेणे यांसारख्या काही समकालीन मुद्द्यांवर सखोल परीक्षण केले जाणार आहे.

शांतता मोहिमांमधील आव्हानांचा प्रथम अनुभव असलेले  शिक्षणतज्ञ आणि अभ्यासकांनी सादर केलेल्या सूक्ष्म दृष्टीकोनांचा या मंचात  समावेश असेल.भारतीय सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी मुख्य भाषणे होतील  या  दोन दिवसीय मंचामध्ये खालील सत्रांचा समावेश असेल.

  • पहिल्या सत्रात अराज्य घटक आणि शहरी युद्धाचा समावेश असलेल्या परिस्थितीत शांतता राखण्यासाठी आयएचएल  तत्त्वांच्या वापरावर चर्चा केली जाईल.
  • दुसऱ्या सत्रात  नागरी आदेशांचे संरक्षण करणे आणि आयएचएल  मानदंडांचे एकत्रीकरण करून त्यावर मात करण्यासंदर्भातील मर्यादांवर विश्लेषण करण्यात येईल.
  • तिसऱ्या सत्रात  जेव्हा शांती सैनिकांना लक्ष्य केले जाते तेव्हा उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर चौकट तपासणे आणि त्यांचे संरक्षण वाढवण्यासाठी उपाय यावर चर्चा केली  जाईल.
  • चौथ्या सत्रात  लिंगभाव -समावेशक शांतता राखण्याचे महत्त्व आणि महिला शांती सैनिकांसाठी  आव्हाने यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
  • पाचव्या सत्रात डेटा विश्लेषण , कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि अत्याधुनिक देखरेख यंत्रणा  अधिक प्रभावी शांतता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर चर्चा केली जाईल.

या कार्यक्रमाचा समारोप पूर्ण सत्राने होईल, शांतीरक्षक  अभ्यासकांसाठी विविध मार्गांचे एकत्रीकरण करणे  आणि आयएचएल वरील अधिक माहितीपूर्ण  चर्चेसाठी शिफारसी प्रदान करणे आणि संयुक्त राष्ट्र  शांतता मोहिमांमध्ये  त्या समाविष्ट करणे हा या सत्राचा उद्देश आहे. या  मंचादरम्यानच्या चर्चा    शांततारक्षक आणि नागरिकांचे हक्क आणि सुरक्षितता सुनिश्चित करतानाच  शांतता राखणे अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल आणि धोरण आराखडा विकसित करण्यात योगदान देऊ शकतात.

N.Meshram/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978165) Visitor Counter : 90