कंपनी व्यवहार मंत्रालय
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था आणि भागीदार संस्थेकडून 'बीआरएसआरः भारतातील व्यवसायांकडून जाहीर होणाऱ्या बिगर-आर्थिक व्यवहारांच्या प्रवासाचा मागोवा' या विषयावरील राष्ट्रीय परिषदपूर्व वेबिनारचे आयोजन
Posted On:
18 NOV 2023 8:46PM by PIB Mumbai
भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था (IICA) आणि भागीदार संस्थांनी नवी दिल्ली येथे काल 'बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनिबिलिटी रिपोर्टिंग (BRSR) यावर भर देणारे जबाबदार व्यवसाय वर्तन' या विषयावरील राष्ट्रीय परिषदपूर्व वेबिनारचे आयोजन केले. या परिषदेत 928 कंपन्यांनी सार्वजनिक पद्धतीने जाहीर केलेल्या माहितीच्या विश्लेषणावर ऊहापोह करण्यात आला, ज्यामुळे भारतातील व्यवसायांकडून जाहीर होणाऱ्या बिगर-आर्थिक व्यवहारांच्या प्रवासासाठी मार्गदर्शक दृष्टीकोन प्राप्त झाला.
विविधता, भौतिकता आणि व्यवसाय संबंधित आरोग्य आणि सुरक्षा यावर मुख्य भर देत खालील उद्दिष्टे साध्य करण्याचा या वेबिनारचा उद्देश होताः
- बीआरएसआर नेटवर्कचे सखोल ज्ञान प्राप्त करणे
- बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट (BRR) ते बीआरएसआर कडून जाहीर होणाऱ्या माहितीच्या उत्पत्तीचा माग काढणे
- जाहीर झालेल्या माहितीच्या कलाचे विश्लेषण करून कंपन्या आणि हितधारकांसोबत संपर्क वाढवण्यासाठी ही माहिती कशा प्रकारे उपयुक्त असेल हे निश्चित करणे.
बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट (BRR) या पूर्वीच्या व्यवस्थेच्या तुलनेत बीआरएसआर एका अधिक जास्त समावेशक प्रश्नांच्या संचाची सुविधा देते, ज्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती जाहीर करणे समाविष्ट आहे. एक प्रभावी संपर्क साधन म्हणून बीआरएसआर एखाद्या संस्थेच्या बिगर- आर्थिक कामगिरीची माहिती जाहीर करण्याची सुविधा उपलब्ध करते.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977932)
Visitor Counter : 115