आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत, आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत डॉ.मनसुख मांडवीया यांचे प्रमुख भाषण
जागतिक प्रशासनाच्या संरचनेत सुधारणा करून ते आजच्या वास्तविकतेला सुसंगत आणि एकविसाव्या शतकातील आव्हानांवर मात करण्यास, विशेषतः ग्लोबल साऊथच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेवर मांडविया यांनी दिला भर
Posted On:
17 NOV 2023 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
पहिल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेतील गती कायम ठेवत, त्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, भारताने आरोग्यविषयक तीन महत्वाचे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यातील एक म्हणजे, आरोग्य विषयक आपत्कालीन स्थितीवर प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद. औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य अधिकाधिक दृढ करणे आणि डिजिटल आरोग्यविषयक नवोन्मेष तसेच उपाययोजना ज्याद्वारे, ग्लोबल साऊथ मधील देशांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठीची भारताची कटिबद्धता व्यक्त होते, त्याद्वारे जागतिक आरोग्यविषयक चर्चा आणि उपाययोजनांमधे सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी केले. दुसऱ्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत आरोग्य मंत्र्यांच्या सत्राला आभासी स्वरूपात त्यांनी संबोधित केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही शिखर परिषद आयोजित केली आहे.
“ग्लोबल साऊथ मधील देशांना अभूतपूर्व आव्हानांचा सामना करावा लागतो आहे.” असे नमूद करत डॉ. मांडवीया यांनी, ‘ग्लोबल प्रशासन संरचनांमधे सुधारणा करून, आजच्या वास्तविकतेशी ती अधिक सुसंगत करण्याच्या आणि एकविसाव्या शतकातील जागतिक आव्हांनावर मात करत, विशेषतः ग्लोबल साऊथ च्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनवण्यासाठी” भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
“एक आरोग्य” ह्या संकल्पनेवर काम करतांना भारताने हाती घेतलेल्या उपाययोजना आणि उपक्रम अधोरेखित करतांना डॉ. मांडवीया यांनी सांगितले की, “राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र” भारताच्या एक आरोग्याशी संबंधित प्रयत्नांचा महत्वाचा पैलू असून, एक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मूलभूत तत्व म्हणून त्यांची अंमलबजावणी करण्यात या केंद्राची भूमिका महत्वाची आहे.
डॉ.मांडवीया यांनी अर्थव्यवस्था, समाज, आरोग्य सेवा प्रणाली, शिक्षण प्रणाली आणि पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. शाश्वत विकासात महिलांची मध्यवर्ती भूमिका मान्य करणे महत्त्वाचे आहे, असेही ते पुढे म्हणाले. ग्लोबल साउथ देशात, सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. "डिजिटल प्लॅटफॉर्म, नेटवर्क आणि सेवांमध्ये आरोग्य सेवा आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि वैद्यकीय संसाधने सर्वांना समान रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे ठरले आहेत.” असे मांडवीया यांनी सांगितले.
आजच्या परिस्थितीत, परस्पर सहकार्य हा केवळ एक पर्याय नसून ती गरज ठरली आहे, असे ते म्हणाले. याच संदर्भात, जी 20 च्या नवी दिल्ली जाहीरनाम्यात उल्लेख केल्यानुसार, ‘एक आरोग्य’ संकल्पना प्रत्यक्ष राबवण्यास भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
आपले भाषण संपवतांना, मांडवीया यांनी उपस्थित सर्व प्रतिनिधींना, वसुधैव कुटुंबकम् या भारताच्या सांस्कृतिक मूल्याशी सुसंगत राहून, "जग एक कुटुंब आहे" सांगत, परस्पर मानवी संबंधावर भर देत, ‘एक आरोग्य’ या दृष्टीकोनासाठीची बांधिलकी दृढपणे टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न, ग्लोबल साउथमधील राष्ट्रांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत उपायांचे महत्त्व मान्य करून, ग्लोबल साउथमध्ये सहकार्य, विश्वास आणि वृद्धी जोपासण्यासाठी असले पाहिजेत, असे मांडवीया म्हणाले.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977748)
Visitor Counter : 95